प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू, ट्रकच्या धडकेने जागीच ठार; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Singer Passed Away : प्रसिद्ध गायकाचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. वयाच्या 37 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
advertisement
1/7

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक हरमन सिद्धू यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
advertisement
2/7
पंजाबची लोकप्रिय गायिका मिस पूजासोबत हरमन सिद्धू यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. पण आता कमी वयात त्यांचे निधन झाल्याने सेलिब्रिटींसह चाहत्यांना शॉक बसला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
advertisement
3/7
मीडिया रिपोर्टनुसार, हरमन सिद्धू यांचा शुक्रवारी मध्यरात्री भयावह अपघात झाला आहे. हरमन यांची गाडी ट्रकला धडकल्याने गायकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हरमन सिद्धू रात्री 12 वाजता शूटिंगवरुन आपल्या गावी ख्लालाला परतत असताना हा अपघात झाला आहे. घटनास्थळी ताबडतोब पोलिस पोहोचले आणि हरमन सिद्धू यांची बॉडी कुटुंबियांच्या ताब्यात दिली.
advertisement
4/7
हरमन सिद्धू यांचे 'पेपर या प्यार' हे गाणं चांगलच लोकप्रिय झालं होतं. सोशल मीडियावरदेखील हे गाणं व्हायरल झालं होतं. या गाण्याने हरमन सिद्धू यांना रातोरात सुपरस्टार बनवलं. हरमन सिद्धूने पंजाबची लोकप्रिय गायिका मिस पूजासोबतची अनेक अल्बम साँग रेकॉर्ड केले आहेत. यात 'लव्ह मॅरेज','थकेवन जट्टन दा','पई गया प्यार' आणि 'खुलियां खिडकियां' सारख्या अनेक हिट गाण्यांचा समावेश आहे.
advertisement
5/7
हरमान सिद्धू यांची 2 गाणी लवकरच रिलीज होणार होती. या गाण्यांचं शूटिंगदेखील पार पडलं होतं. या गाण्याच्या कामानिमित्त हरमान मानसा या ठिकाणी गेला होता. पण परतत असताना हा मोठा अपघात घडला आणि गायकाला आपला जीव जमवावा लागला.
advertisement
6/7
हरमान सिद्धू यांच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी आहे. हरमान सिद्धू हा पालकांचा एकुलता एक मुलगा होता.
advertisement
7/7
हरमान सिद्धू यांची अनेक डुएट गाणी लोकप्रिय झाली आहेत. 2025 च्या अखेरीस त्यांची दोन नवी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. हमरान सिद्धू Gen Zs चा अत्यंत चाडका होता. त्याच्या गाण्यांचे बोल फॅमिली बॉन्ड, सोशल थीमवर आधारित असत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू, ट्रकच्या धडकेने जागीच ठार; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास