TRENDING:

Friday OTT Release : विकेंडची सोय झाली! OTT वर आल्यात 5 नव्याकोऱ्या Must Watch मुव्ही आणि सीरिज

Last Updated:
Friday OTT Release : प्रत्येक शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होतात. आजच्या शुक्रवारीदेखील ओटीटीवर एंटरटेनमेंटचा डोस मिळणार आहे.
advertisement
1/7
Friday OTT Release : 5 नव्याकोऱ्या Must Watch मुव्ही आणि सीरिज
ओटीटीप्रेमींसाठी वीकेंड खास करायला सर्व प्लॅटफॉर्म शुक्रवारी सज्ज असतात. प्रत्येक शुक्रवारी ओटीटीवर अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असतात. यामुळे वीकेंड आणखी मजेदार होतो. आजच्या शुक्रवारीही अनेक दर्जेदार सीरिज आणि चित्रपट रिलीज झाले असून घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
advertisement
2/7
7 नोव्हेंबर 2025 रोजी ओटीटीवर अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज झाले आहेत. वीकेंड खास करायचा विचार करत असाल तर या यादीतील एक सीरिज आणि चित्रपटाचा आताच वीकेंडच्या प्लॅनमध्ये समावेश करा.
advertisement
3/7
महारानी 4 : आजच्या शुक्रवारी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या बहुप्रतीक्षित सीरिजमध्ये हुमा कुरैशीच्या 'महारानी 4' या वेबसीरिजचा समावेश पहिल्या क्रमांकावर आहे. या सीरिजचा हा चौथा सीझन आहे. प्रत्येक सीझनमध्ये हुमाने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केलं आहे. सोनी लिववर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
4/7
बारामूला : मानव कौल आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. मानव कौलचा 'बारामूला' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 'बारामूला' हा एक सुपरनॅचरल मिस्ट्री चित्रपट आहे. काश्मीरमधील भीतीदायक गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात थ्रिलर, सायकोलॉजिकल ड्रामा आणि लोकल कथांचं मिश्रण पाहायला मिळेल. एका पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. हरवलेल्या मुलांचा शोध हा पोलीस अधिकारी कसा घेणार हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहाच.
advertisement
5/7
चिरंजीवा : चिरंजीवा हा एक तेलुगु फँटेसी कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका रुग्णवाहिका चालकाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. AHA या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकतात.
advertisement
6/7
फ्रैंकेंस्टीन : गिलर्मो डेल टोरो यांचा 'फ्रैंकेंस्टीन' हा नेटफ्लिक्सवरील चित्रपट मैरी शेली यांची क्लासिक गोष्ट पुन्हा एकदा दाखवतो. या चित्रपटात ऑस्कर आयजॅक विक्टर फ्रेंकस्टीन आणि जैकब एलोर्डी क्रिएचरच्या भूमिकेत आहे.
advertisement
7/7
एक चतुर नार : दिव्या खोसला आणि नील नितिन मुकेश यांचा 'एक चतुर नार' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. अखेर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday OTT Release : विकेंडची सोय झाली! OTT वर आल्यात 5 नव्याकोऱ्या Must Watch मुव्ही आणि सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल