TRENDING:

Friday OTT Releases : दिवाळी संपली, आता या विकेंडला काय! ओटीटीवर पाहा या जबरदस्त मूव्ही-सीरिज

Last Updated:
OTT Releases This Weekend: ऑक्टोबर महिन्याचा हा शुक्रवार ओटीटीप्रेमींसाठी खूप खास आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त चित्रपट आणि सीरिज रिलीज झाले आहेत. त्यामुळे या वीकेंडला प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
advertisement
1/6
Friday OTT Releases : ओटीटीवर पाहा या जबरदस्त मूव्ही-सीरिज
परम सुंदरी (Param Sundari) : 'परम सुंदरी' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा हा परम आणि जान्हवी कपूर ही सुंदरीच्या भूमिकेत आहे. ही कथा परम नावाच्या एका श्रीमंत, निष्काळजी तरुणाची आहे जो एका मॅचमेकिंग अॅपचा वापर करतो आणि केरळमधील एका सुंदर होमस्टे चालवणाऱ्या तरुणीशी त्याचा मेळ लागतो. ही कथा त्यांच्या संस्कृतींच्या आणि जीवनशैलींच्या प्रवासाचे चित्रण करते, ज्यामुळे अनेक मजेशीर आणि मनाला भिडणाऱ्या घटना घडतात. हा चित्रपट आज प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
advertisement
2/6
शक्ति थिरुमगन (Shakthi Thirumagan) : शक्ति थिरुमगन हा एक तमिळ राजकीय थ्रिलर आहे, जो किट्टू (विजय अँटोनी) या लॉबिस्टची कथा सांगतो. आपल्या आईच्या खुनानंतर तो न्याय मिळवण्यासाठी आपले कौशल्य वापरतो आणि त्या खुनात सामील असलेल्या लोकांना समोर आणण्याचाही प्रयत्न करतो. या चित्रपटात विजय अँटोनी, सुनील कृपलानी , वागई चंद्रशेखर आणि तृप्ती रवींद्र हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
advertisement
3/6
मारीगल्लू (Maarigallu) : कन्नड थ्रिलर चित्रपट 'मारीगल्लू' देवराज पुजारी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात प्रवीण तेजस, निनाद हरित्सा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. ZEE5 वर हा चित्रपट प्रेक्षकांना 31 ऑक्टोबर 2025 पासून पाहता येईल.
advertisement
4/6
कुरुक्षेत्र भाग 2 (Kurukshetra: Part 2) : कुरुक्षेत्र भाग 2 ही नेटफ्लिक्सवरील अॅनिमेटेड सीरिज आहे. ही सीरिज महाभारतच्या 18 दिवसांच्या युद्धातील शेवटच्या नऊ दिवसांवर केंद्रित आहे. या कथेत अभिमन्यूचा दुःखद मृत्यू, अर्जुन आणि कर्ण यांच्यातील अंतिम युद्ध आणि भीमच्या द्वंद्वासारख्या महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. नेटफ्लिक्सची ही मायथॉलॉजिकल ड्रामा सीरिज 24 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
advertisement
5/6
दे कॉल हिम OG (They Call Him OG) : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणचा 'दे कॉल हिम OG' हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. सुजीतच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची खासियत म्हणजे बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी त्यातून आपले तेलुगूत पदार्पण करत आहे. 23 ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
advertisement
6/6
नोबडी वॉन्ट्स दिस (Nobody Wants This Season 2) : नेटफ्लिक्सवरील 'नोबडी वॉन्ट्स दिस' हा रोमँटिक कॉमेडी शो असून याचा दुसरा सीझन 23 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एरिन फोस्टर निर्मित या सीरिजमध्ये क्रिस्टन बेल, अॅडम ब्रॉडी, जस्टिन लूप, टिमोथी सिमन्स हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday OTT Releases : दिवाळी संपली, आता या विकेंडला काय! ओटीटीवर पाहा या जबरदस्त मूव्ही-सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल