TRENDING:

Friday Release : आपला सिद्धूचा 'आतमी बातमी फुटली' ते खिलाडीचा 'JOLLY LLB 3', शुक्रवारी रिलीज होतायत 'हे' चित्रपट

Last Updated:
Friday Theatre Release : 19 सप्टेंबर 2025 म्हणजे येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी अनेक दमदार चित्रपट रिलीज होत आहेत.
advertisement
1/9
'आतमी बातमी फुटली' ते 'JOLLY LLB 3', शुक्रवारी रिलीज होतायत 'हे' चित्रपट
विजय कमलकर दिग्दर्शित कुला टू वेंगुर्ला या चित्रपटात गाव आणि शहर यांच्यातील संघर्ष, नाती व स्वप्नांची गोषअट दाखविण्यात आली आहे. वैभव मांगले आणि वीणा जामकर यांचा हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
2/9
सिद्धार्थ जाधव अभिनीत 'आतली बातमी फुटली' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. धमला, थ्रिल आणि टोटल एंटरटेनमेंट असणारा हा चित्रपट आहे. नक्की कोणती बातमी फुटणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
3/9
ब्यूटी हा तेुलगू चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या एका वडिलांवर आधारित हा चित्रपट आहे.
advertisement
4/9
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित 'अजेय:द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' हा चित्रपट याच शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात योगी आदित्यनाथ यांचा संन्यासी होण्यापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात अनंत जोशी यांनी योगींची भूमिका साकारली आहे.
advertisement
5/9
क्षय कुमार आणि अरशद वारसी यांचा कोर्टरूम ड्रामा असणारा ‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट याच शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना सिनेमाची प्रतीक्षा आहे.
advertisement
6/9
अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यांचा हा नवीन चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे, मोनिका पवार आणि जीशान आयूब यांचा समावेश आहे. चित्रपटात दोन जुळ्या भावांची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपटही 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
advertisement
7/9
'रूम नंबर 111' हा एक कमाल दाक्षिणात्य थरार, नाट्य असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात अपूर्वा धर्मा कीर्तिराज, गरिमा सिंह, मिमिक्री गोपी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात दिव्या नामक व्यक्ती आपल्या पती आणि मुलांच्या हत्येचा शोध घेताना दिसून येत आहे.
advertisement
8/9
'सबर बोंड' या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहन कानवडेने केलं आहे. एका विचित्र प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. मैत्री आणि सामाजिक वास्तवदेखील या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
advertisement
9/9
जंगल, संघर्ष आणि नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणार 'अरण्य' हा चित्रपट आहे. अमोल दिगांबर दिग्दर्शित अरण्य हा चित्रपट गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित करण्यात आला आहे.या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Friday Release : आपला सिद्धूचा 'आतमी बातमी फुटली' ते खिलाडीचा 'JOLLY LLB 3', शुक्रवारी रिलीज होतायत 'हे' चित्रपट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल