Do You Know : XL, XXL साइजमध्ये घेतो कपडे, पण ‘X’ चा नेमका अर्थ माहितीय? यामागचं लॉजिक क्वचित कोणाला माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
S (Small), M (Medium), L (Large) हे शब्द सर्वांनाच समजतात. पण जेव्हा XL, XXL, XS असे साईज दिसतात तेव्हा अनेकजण गोंधळतात. नेमकं या ‘X’ चा अर्थ काय असतो, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
1/6

आपण कपडे खरेदी करायला जातो तेव्हा शर्ट, टी-शर्ट किंवा ड्रेसवर अनेकदा S, M, L, XL, XXL अशी साइजेसमध्ये ते आपल्याला मिळतात. आपण आपल्या साइज प्रमाणे यांपैकी कपडे घेतो. पण क्वचितच या साइजबद्दल थोडा पुढचा विचार केला असेल आणि त्यांना प्रश्न पडला असेल की ‘X’ चा खरा अर्थ काय?
advertisement
2/6
S (Small), M (Medium), L (Large) हे शब्द सर्वांनाच समजतात. पण जेव्हा XL, XXL, XS असे साईज दिसतात तेव्हा अनेकजण गोंधळतात. नेमकं या ‘X’ चा अर्थ काय असतो, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
3/6
काय दर्शवतं ‘X’?खरंतर, इंग्रजीत ‘X’ म्हणजे ‘Extra’ म्हणजेच अतिरिक्त.XL = Extra Large म्हणजेच अतिरिक्त मोठंXXL = Extra Extra Large म्हणजे खूपच मोठंXS = Extra Small म्हणजे अतिरिक्त लहान
advertisement
4/6
या साईजेसची सुरुवात कशी झाली?पूर्वीच्या काळी कपड्यांत फक्त Small, Medium, Large एवढ्याच साईज उपलब्ध असायच्या. पण लोकांच्या शरीरयष्टीत कालांतराने खूप फरक दिसू लागला. काहींना मोठ्या साईजची गरज होती, तर काहींना अगदी छोट्या. अशा वेळी कपड्यांचे आकार अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘X’ चा वापर सुरू करण्यात आला.
advertisement
5/6
XL आणि XXL मध्ये काय फरक?उदाहरणार्थ, XL शर्टाचं माप साधारण 42 ते 44 इंच असतं. तर XXL शर्टाचं माप 44 ते 46 इंचांपर्यंत जाऊ शकतं. अर्थात, हे माप ब्रँडनुसार बदलू शकतं.
advertisement
6/6
आपल्या रोजच्या आयुष्यात आपण या साईज वापरतो, पण ‘X’ चा खरा अर्थ फार थोड्यांना माहित असतो. त्यामुळे पुढच्या वेळी कपडे खरेदीला गेल्यावर योग्य साईज निवडताना हा छोटासा पण महत्त्वाचा तपशील लक्षात ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Do You Know : XL, XXL साइजमध्ये घेतो कपडे, पण ‘X’ चा नेमका अर्थ माहितीय? यामागचं लॉजिक क्वचित कोणाला माहिती