Dashavatar Collection : 'दशावतार'ला 99 चा फायदा! समोर आला कमाईचा टोटल आकडा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dashavatar Collection : दशावतार सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी 99 रुपयांना तिकिट विक्री करण्यात आली. ज्याचा फायदा सिनेमाला झाल्याचं दिसतंय.
advertisement
1/8

'दशावतार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
advertisement
2/8
'दशावतार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रत्येक दिवशी वाढतंय. सिनेमानं अवघ्या 3 दिवसांत 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
3/8
sacnilkच्या रिपोर्टनुसार, सिनेमाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 5 कोटीहून अधिक झालं आहे. 'दशावतार' सिनेमाने पहिल्याच दिवशी 58 लाखांची कमाई केली.
advertisement
4/8
दुसऱ्या दिवशी सिनेमाने 1.39 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 2.4 कोटींची कमाई केली.
advertisement
5/8
पाचव्या दिवशी यात वाढ झाली असून सिनेमानं 1.30 कोटींचा गल्ला जमवला आहे.
advertisement
6/8
दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'दशावतार'ने पाच दिवसात एकूण 6.80 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
7/8
'दशावतार'च्या पहिल्याच दिवशीचा प्रतिसाद पाहून थिएटरमधील शो वाढवण्यात आले होते. ज्याचा फायदा सिनेमाला झाला.
advertisement
8/8
मंगळवारी थिएटरमध्ये 99 रुपयांत तिकिट विक्री करण्यात आली. ज्याचा फायदाही सिनेमाला झाल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Collection : 'दशावतार'ला 99 चा फायदा! समोर आला कमाईचा टोटल आकडा