TRENDING:

Weather Alert: पुणे ते सोलापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरूच आहे. कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
पुणे ते सोलापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मंगळवारी 13 जिल्ह्यांतील 81 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जांभूळ मंडळात सर्वाधिक 176 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज 17 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात जिल्हानिहाय हवामान कसे असेल, अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 4.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 25.3 अंश सेल्सिअस इतका राहिला. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणार असून वादळी पावसाची शक्‍यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडीप राहिली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 26.9 अंश सेल्सिअस राहिल. आज बुधवारी सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगवान वारे वाहतील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 28 अंश राहिल. तसेच एक दोन वेळा गडगडाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 5 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. तसेच मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 32.6 अंशावर राहिल. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 32 अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली. तसेच 26.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज बुधवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगवान वारे असेल.
advertisement
7/7
राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस कोसळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते सोलापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल