TRENDING:

रांजणगावच्या बाप्पाचा चमत्कार! आदेश बांदेकरांनी सांगितला प्रसंग; म्हणाले, 'कार अपघातात लहान मूल जखमी झालं अन्...'

Last Updated:
Aadesh Bandekar on Ashtavinayak Ganpati Experience : आदेश बांदेकर सध्या अष्टविनायक यात्रा करत आहेत. या यात्रदरम्यान त्यांना आलेला एक अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
advertisement
1/7
रांजणगावच्या बाप्पाचा चमत्कार! कार अपघातात मूल जखमी झालं अन्...
सूत्रसंचालक आणि निर्माते आदेश बांदेकर बाप्पा महाराष्ट्राचा, महिमा अष्टविनायकाचा या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
advertisement
2/7
मोरगावपासून सुरू होणारी ही यात्रा सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री अशा आठ ठिकाणी पूर्ण होते.
advertisement
3/7
महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा ही केवळ मंदिरदर्शनापुरती नसून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचं अद्वितीय प्रतीक आहे. या यात्रेदरम्यान आदेश बांदेकर यांनी रांजणगावला घडलेला बाप्पाचा एक चमत्कार सांगितला. एका कार अपघाताचा प्रसंग त्यांनी सांगितला.
advertisement
4/7
मटाने दिलेल्या वृत्तानुसार, आदेश बांदेकर म्हणाले, "रांजणगावच्या यात्रेत एकदा कार अपघात झाला होता. गाडीत एक लहान मूल होतं. ते बाळ जखमी झालं, पण सुरक्षित राहिलं."
advertisement
5/7
"त्या कुटुंबाने हा प्रसंग गणरायाच्या कृपेचं रूप मानलं. अशा चमत्कारिक अनुभवांनी श्रद्धा किती खोलवर रुजते, हे मला जाणवतं."
advertisement
6/7
आदेश बांदेकर पुढे म्हणाले, "अनेक भाविक पावसात, ओलसर रस्त्यांवरून चालत असतानाही गणपती बाप्पाच्या जयघोषात आनंदाने सहभागी होतात. टाळ-मृदुंगाचा निनाद, प्रसादाची गोडी आणि भक्तिभावाचा उत्साह यात्रेला अधिक रंगतदार बनवतो."
advertisement
7/7
"अष्टविनायक काय किंवा कोणतीही यात्रा आपण घडवत नाही, आपण फक्त निमित्त असतो", असंही आदेश बांदेकर यांनी म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रांजणगावच्या बाप्पाचा चमत्कार! आदेश बांदेकरांनी सांगितला प्रसंग; म्हणाले, 'कार अपघातात लहान मूल जखमी झालं अन्...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल