TRENDING:

Gayatrri Datar : गायत्री दातारची लगीन घाई! केळवणासाठी गाठलं मुंबईपासून 566 km दूरचं ठिकाण, म्हणाली 'कमी वेळेत...'

Last Updated:
Gayatri Datar Kelvan : अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गायत्रीचं पहिलं वहिलं केळवण पार पडलंय ते ही मुंबईपासून 566 किलोमीटर दूर.
advertisement
1/8
गायत्री दातारची लगीन घाई! केळवणासाठी गाठलं मुंबईपासून 566 km दूरचं ठिकाण, म्हणाली  'कमी वेळेत...'
'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लग्नाआधीच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे. केळवणासाठी गायत्री मुंबईपासून 566 किलोमीटर दूर गेली.
advertisement
2/8
गायत्रीच्या या केळवणाची बातच काही और होती. पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांनी सजलेल्या या मेजवानीत फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि इतर अनेक पदार्थांचा समावेश होता. या खास केळवणाचं आयोजन तिच्या नाटकाच्या टीमनं केलं होतं.
advertisement
3/8
गायत्री सध्या 'सीरियल किलर' या नाटकात काम करते. त्या नाटकाच्या निर्माते आणि टीमने तिच्यासाठी हे खास केळवण केलं. या टीममध्ये अभिनेते भाऊ कदम, गौरी किरण, तेजस आणि संपूर्ण युनिटचा सहभाग होता.
advertisement
4/8
या खास क्षणांचे फोटो शेअर करत गायत्रीने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "बेस्ट लोकांकडून बेस्ट केळवण. आयुष्यात खूप कमी वेळा अशी माणसं भेटतात जी कमी वेळेत आपलंसं करून टाकतात."
advertisement
5/8
"'सीरियल किलर'चे निर्माते, दिग्दर्शक, भाऊ कदम, गौरी, तेजस आणि संपूर्ण टीम तशीच आहे. थँक्यू सो मच सर आणि फॅमिली, इतकं छान केळवण केल्याबद्दल." गोव्यात गायत्रीचं केळवण पार पडलं.
advertisement
6/8
"माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे," असं कॅप्शन देत गायत्रीने तिच्या प्रेमाची कबूली दिली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चवरे असून तो आयआयटी बॉम्बेचा टॉपर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल फोटोग्राफीची विशेष आवड असून तो ड्रोन फोटोग्राफरही आहे.
advertisement
7/8
गायत्री आणि श्रीकांत यांचं नातं अरेंज विथ लव्ह आहे. दोघांनी कुटुंबाच्या संमतीने एकमेकांना समजून घेत लग्नाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे करिअरमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करत असलेली गायत्री सध्या खूपच आनंदात दिसत आहे.
advertisement
8/8
गायत्री दातारच्या या लगीन घाईमुळे तिचे चाहतेही आनंदी झाले असून आता तिचं लग्न कधी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gayatrri Datar : गायत्री दातारची लगीन घाई! केळवणासाठी गाठलं मुंबईपासून 566 km दूरचं ठिकाण, म्हणाली 'कमी वेळेत...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल