TRENDING:

आईच्या दुसऱ्या लग्नात साक्षीदार, पण स्वत:च्या लग्नाच्या बोलणीत एकटीच; गिरिजा ओकची Emotional Story

Last Updated:
आज नॅशनल क्रश झालेली अभिनेत्री गिरिजा ओकच्या आयुष्याची स्टोरी मात्र अनेकांना इमोशनल करून जाईल. गिरिजानं नुकतीच तिच्या आयुष्यातील कोणालाच माहिती नसलेली गोष्ट समोर आणली.
advertisement
1/9
Girija Oak: आईच्या दुसऱ्या लग्नात साक्षीदार, पण स्वत:च्या लग्नाच्या बोलणीत एकटीच
सध्या 'नॅशनल क्रश' म्हणून ओळख मिळवलेल्या अभिनेत्री गिरिजा ओक हिने आपल्या आयुष्यातील अनेक पैलू आतापर्यंत चाहत्यांसमोर उघड केले आहेत. बालपण, आई-वडिलांचा डिवोर्स, अभिनयाचा प्रवास, लग्न, मातृत्व अशा अनेक विषयांवर ती आजवर बोलली आहे. पडद्यावर सक्सेसफुल करिअर करत असलेल्या गिरिजा ओकची रिअल लाइफ स्टोरी मात्र खूप इमोशनल करणारी आहे. 
advertisement
2/9
गिरिजानं फार कमी वयात आई-वडिलांचा डिवोर्स पाहिला. त्यानंतर त्यांची झालेली दुसरी लग्न देखील पाहिली. गिरिजाच्या आईच्या दुसऱ्या लग्नात तिनं साक्षीदार म्हणून सही केली होती. हे गिरिजा फार अभिमानानं सांगते. 
advertisement
3/9
आईच्या दुसऱ्या लग्नाची बोलणी ते तिच्या लग्नात साक्षीदार असण्यापर्यंतच प्रवास तिनं केला. पण तिच्या स्वत:च्या लग्नाची बोलणी करायला ती एकटीच गेली होती. गिरिजानं एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला होता.
advertisement
4/9
 "माझं लग्न ठरलं आणि बोलणी करण्यासाठी सासूबाईंनी बोलावलं. त्यावेळी माझ्या आई-वडिलांची दोन वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगळी लग्न झाली होती. खूप मोठी फॅमिली झाली होती. बोलणी करायला कोण येणार असं सासरच्यांनी विचारल्यानंतर मीच येते" असं गिरिजानं म्हटलं होतं. 
advertisement
5/9
गिरिजानं दिल के करिबला दिलेल्या मुलाखतीत आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं. आईच्या लग्नानंतर गिरिजाला आलेलं एकटेपण याविषयीही तिनं सांगितलं.  
advertisement
6/9
गिरिजा म्हणाली, "लग्नाआधी आणि लग्नानंतरही काही वर्षे बराच काळ एकटी राहिली. कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असायची. मुंबईत एकटी राहण्याची वेळ यायची. 12 ते 16 तासांच्या शिफ्टनंतर घरी कोणीच नसणं खूप त्रासदायक वाटायचं."
advertisement
7/9
"कधी कधी मला असं खूप वाटायचं की आता जर आई माझ्या बरोबर असती तर मला गरम जेवण मिळालं असतं, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं असतं. तेव्हा मला तिची खूप आठवण यायची."
advertisement
8/9
गिरिजा पुढे म्हणाली, "माझ्या लग्नाच्या थोडं आधी तिचं दुसरं लग्न झालं होतं. तिने जेव्हा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आणि तिने मला हे सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पुन्हा आपलं आयुष्य उभं करायला हिंमत लागते."
advertisement
9/9
"मला माझ्या आईचं खूप कौतुक वाटतं तिने पुन्हा आपलं आयुष्य उभं केलं. पुन्हा आपलं सुख पुन्हा आपल्या हातानं घडवलं, या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. सगळे निर्णय आम्ही एकत्र घेतले.  तिच्या लग्नात मी साक्षीदार म्हणून सही केली आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आईच्या दुसऱ्या लग्नात साक्षीदार, पण स्वत:च्या लग्नाच्या बोलणीत एकटीच; गिरिजा ओकची Emotional Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल