एका रात्रीचे किती घेणार? नॅशनल क्रश होताच गिरीजा ओकला येतायत हादरणारे मेसेज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Girija Oak : 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक हिला सोशल मीडियावर सध्या हादरणारे मेसेज येत आहेत. एका व्यक्तीने तर थेट एका रात्रीचे किती घेणार? असा प्रश्न विचारला आहे. नुकतंच एका मुलाखतीत गिरीजा ओकने याबाबत खुलासा केला आहे.
advertisement
1/7

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक काही दिवसांपूर्वी रातोरात सुपरस्टार झाली आणि तिला 'नॅशनल क्रश'चा टॅग लागला. त्यानंतर मराळमोळ्या गिरीजाच्या प्रत्येक हालचालींवर नेटकरी लक्ष ठेवून होते. त्यानंतर अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत समाधान व्यक्त केलं. तर दुसरीकडे फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी तिने आपली नाराजीदेखील व्यक्त केली.
advertisement
2/7
गिरीजा ओक 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,"माझं संपूर्ण कुटुंब इंडस्ट्रीक काम करत असल्याने व्हायरल होणाऱ्या बातम्यांबाबत किंवा नेटकऱ्यांच्या विचित्र कमेंट्सबद्दल त्यांना काही वाटत नाही. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत. उलट त्यांना हे सगळं खूप मजेशीर वाटलं".
advertisement
3/7
गिरीजा ओक म्हणाली,"नॅशनल क्रश या टॅगवर मला खूप हसू येतं. कारण यामुळे काही बदल घडणार नाही. यामुळे मला कामासाठी ऑफर्स वगैरे येणार नाही आहेत". रातोरात प्रसिद्धी मिळण्यासोबत गिरिजाला अनेक वाईट गोष्टींचाही सामना करावा लागला.
advertisement
4/7
गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' झाल्यानंतर AI चा वापर करत तिचे फोटो मॉर्फ करण्यात आले. सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल झाले. याबाबत बोलताना गिरीजा ओक म्हणाली,"माझे फोटो मॉर्फ केले गेले. तर काही व्हिडीओमध्ये मी काही विचित्र गोष्टी करताना दिसले. काही फोटोंमध्ये माझे कपडे गायब होते".
advertisement
5/7
गिरीजा ओक म्हणाली,"मार्फ केलेले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर असणारच आहेत आणि ते एडिटेड आहेत हेही सर्वांना माहिती आहे. माझ्या मुलालाही हे समजेल. मी पडद्यावर इंटिमेट सीन करणं आणि माझे फोटो मॉर्फ करणं यात फरक आहे. मी कोणत्या गोष्टी निवडते आणि माझ्या परवागनीशिवाय जे केलं जातंय यात फरत आहे. जर मला एखाद्या व्यक्तीचा हात पकडायचा असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की कोणीही व्यक्ती माझा पकडू शततो. याबद्दल काही बोलणं मला योग्य वाटलं नाही".
advertisement
6/7
गिरीजा ओकने यावेळी सोशल मीडियावर काही हादरणारे मेसेज आल्याचा खुलासाही केला. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, तू मला फक्त एक संधी दे, एका तासाचे किती घेणार? अशापद्धतीचे असंख्य मेसेज गिरीजा ओकला यावेळी आले.
advertisement
7/7
हादरवणाऱ्या DM बद्दल बोलताना गिरीजा ओक म्हणाली,"मेसेज करणारे लोक खऱ्या आयुष्यात माझ्याकडे मान वर करुनही बघणार नाहीत. सोशल मीडियावर काहीही बोलणारे हे लोक खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाने आणि आदराने वागतात. हा एक विचित्र झोन आहे. या व्हर्चुअल स्पेसला किती गांभीर्याने घ्यावं यावर मोठा वाद होऊ शकतो".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका रात्रीचे किती घेणार? नॅशनल क्रश होताच गिरीजा ओकला येतायत हादरणारे मेसेज