Girija Oak : माहेर नंबरी, तर सासर दस नंबरी! गिरिजा ओकपेक्षाही पॉप्युलर आहे तिची नणंद, सासू-सासऱ्यांनीही गाजवलीय इंडस्ट्री
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak Family : अभिनेते गिरीश ओक यांची कन्या असलेल्या गिरिजाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. मात्र, तिच्या सासरकडची मंडळीही काही कमी नाहीत.
advertisement
1/8

मुंबई: सध्या सोशल मीडियावर 'निळ्या साडीवाली' म्हणून रातोरात देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले चर्चेत आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि मनमोहक हास्यामुळे ती नॅशनल क्रश बनली आहे.
advertisement
2/8
मात्र, मराठी प्रेक्षकांना गिरिजाबद्दल माहिती असली तरी, तिचे सासरचे फिल्मी कनेक्शन खूप कमी लोकांना माहीत आहे. गिरिजाचे सासर मनोरंजनसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते.
advertisement
3/8
अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असलेल्या गिरिजाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. मराठी-हिंदीतील यशस्वी करिअरनंतर २०११ मध्ये गिरिजाने सुहृद गोडबोले यांच्याशी लग्न केले.
advertisement
4/8
गिरिजाने मराठी चित्रपटांसह 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी' आणि अगदी शाहरुख खानच्या २०२३ मधील 'जवान' चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ती मनोज वाजपेयी यांच्या 'झेंडे' या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
advertisement
5/8
गिरिजाचे सासरे म्हणजेच सुहृद गोडबोले यांचे वडील श्रीरंग गोडबोले हे मराठीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. तर गिरिजाची सासू या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर आहेत.
advertisement
6/8
गिरिजा ओकची नणंद म्हणजेच पती सुहृदची बहीण देखील मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय आणि हटके अभिनेत्री आहे. गिरिजाच्या नणंदेचे नाव मृण्मयी गोडबोले आहे.
advertisement
7/8
मृण्मयीने 'चि. व चि.सौ.कां.' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती तरुणांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या 'भाडिपा' या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील 'आई आणि मी' या व्हिडिओ मालिकेत 'जुई'च्या भूमिकेत दिसते.
advertisement
8/8
गिरिजा आणि मृण्मयी यांचा बाँड खूप खास असून त्या दोघीही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात, ज्यामुळे त्यांच्यातील मैत्री दिसून येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak : माहेर नंबरी, तर सासर दस नंबरी! गिरिजा ओकपेक्षाही पॉप्युलर आहे तिची नणंद, सासू-सासऱ्यांनीही गाजवलीय इंडस्ट्री