Guess Who: पाचवीही शिकली नाही, पण ठरली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, घ्यायची अनिल कपूरपेक्षाही जास्त फी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood's most expensive actress: सौंदर्याची खाण, अभिनयाचं पॉवरहाऊस आणि डान्सची जादूगार असलेल्या या अभिनेत्रीने केवळ प्रेक्षकांवरच नाही, तर मोठ्या निर्मात्यांच्या काळजावरही राज्य केलं.
advertisement
1/9

मुंबई: चंदेरी दुनियेत अशी काही नावं असतात, जी काळाच्या पडद्याआड गेली तरी लोकांच्या मनातून कधीच पुसली जात नाहीत. असंच एक नाव म्हणजे 'हवा हवाई' गर्ल श्रीदेवी.
advertisement
2/9
सौंदर्याची खाण, अभिनयाचं पॉवरहाऊस आणि डान्सची जादूगार असलेल्या श्रीदेवींनी केवळ प्रेक्षकांवरच नाही, तर मोठ्या निर्मात्यांच्या काळजावरही राज्य केलं. पण या ग्लॅमरस अभिनेत्रीच्या मनाक एक अशी खंत होती, जी तिला आयुष्यभर सतावत राहिली.
advertisement
3/9
आजच्या काळात कलाकार पदव्या घेऊन फिल्म इंडस्ट्रीत येतात, पण श्रीदेवींचा प्रवास अगदी वेगळा होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिल्या. बालकलाकार म्हणून सुरू झालेला हा प्रवास इतका वेगवान होता की, त्यांना कधी शाळेत जाण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
4/9
एका जुन्या मुलाखतीत श्रीदेवींनी हळहळ व्यक्त केली होती, त्या म्हणाल्या होत्या, "मला कधीच शालेय जीवन जगता आलं नाही. माझ्याकडे अभ्यासासाठी वेळच उरला नव्हता, कारण मी सतत शूटिंगमध्ये व्यग्र असायचे." सुपरस्टार असूनही आणि पाच भाषांवर प्रभुत्व असूनही, शालेय शिक्षणाची उणीव त्यांना नेहमीच टोचत राहिली.
advertisement
5/9
श्रीदेवींच्या नावावर एक असा विक्रम आहे जो आजही थक्क करणारा आहे. त्या काळात जेव्हा चित्रपट केवळ अभिनेत्यांच्या नावे विकले जायचे, तेव्हा श्रीदेवी या पहिली महिला सुपरस्टार ठरल्या.
advertisement
6/9
त्यांचं स्टारडम इतकं होतं की, अनेक चित्रपटांत त्या मुख्य अभिनेत्यापेक्षाही जास्त मानधन वसूल करायच्या. निर्माते बोनी कपूर तर त्यांच्यावर इतके फिदा होते की, त्यांनी 'मिस्टर इंडिया' चित्रपटासाठी श्रीदेवींना चक्क तोंडी मागितलेली रक्कम देऊन टाकली होती.
advertisement
7/9
यशराज फिल्म्स (YRF) आज जितकं मोठं साम्राज्य आहे, तसं ते ८० च्या दशकात नव्हतं. खरं तर, यश चोप्रांचे एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप होत होते आणि त्यांचं प्रोडक्शन हाऊस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होतं. अशा काळात त्यांनी 'चांदनी'चा जुगार खेळला.
advertisement
8/9
पांढऱ्या शुभ्र साडीतल्या श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले. यश चोप्रा यांनी स्वतः कबूल केलं होतं की, जर 'चांदनी' चालली नसती, तर कदाचित यशराज फिल्म्स आज अस्तित्वात नसतं. श्रीदेवींच्या त्या एका निर्णयाने केवळ यश चोप्रांनाच नाही, तर संपूर्ण बॉलिवूडला एक नवी दिशा दिली.
advertisement
9/9
तसं पाहायला गेलं तर श्रीदेवींनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले, पण प्रेक्षकांना त्यांची जोडी सर्वात जास्त आवडली ती अनिल कपूर यांच्यासोबत. 'मिस्टर इंडिया', 'जुदाई', 'लाडला' अशा अनेक सिनेमांतून या जोडीने पडद्यावर आग लावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: पाचवीही शिकली नाही, पण ठरली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, घ्यायची अनिल कपूरपेक्षाही जास्त फी