TRENDING:

Guru Dutt Granddaughter : गुरू दत्तच्या नातींना पाहिलंय! एक करतेय सुपरहिट वेब सीरिज, दुसरी करतेय साऊथमध्ये डेब्यू

Last Updated:
Guru Dutt Granddaughter : अभिनेते गुरू दत्त यांचा अभिनय आणि त्यांचे सिनेमे अजरामर आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष त्यांच्या कुटुंबातील कोणीच पुढे आलं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये का गुरू दत्त यांना दोन सुंदर नाती आहेत. त्या देखील इंडस्ट्रीत काम करत आहेत.
advertisement
1/10
गुरू दत्तच्या नातींना पाहिलंय!1 करतेय सुपरहिट वेब सीरिज,दुसरीचा साऊथमध्ये डेब्यू
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गुरु दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान नाव आहे. आर पार, मिस्टर अँड मिसेस 55, सीआयडी आणि प्यासा यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या 'प्यासा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
advertisement
2/10
गुरू दत्त यांचं आयुष्य म्हणजे एक ट्रॅजेडीच होती. त्यांचं अकाली जाणं अनेकांसाठी चटका लावणारं होतं. त्यांच्या मृत्यूचं गुढ आजूनही उकलू शकलेलं नाही.
advertisement
3/10
10 ऑक्टोबर 1964 रोजी अभिनेते गुरू दत्त यांचं निधन झालं. घरातल्या खोतील ते मृतावस्थेत सापडले. मृत्यूच्या आदल्या रात्री त्याचं बायकोशी भांडणं झालं होतं.
advertisement
4/10
गुरू दत्त यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष त्यांच्या कुटुंबातील कोणीच इंडस्ट्रीत आलं होतं. पण आता अनेक वर्षांनी गुरू दत्त यांच्या नाती समोर आलेत. त्यांना दोन नाती असून दोघीही सिनेसृष्टीत सक्रीय आहेत.
advertisement
5/10
गुरु दत्त यांचा मुलगा अरुण दत्त आणि सून इफत यांनी त्यांच्या मुलींना म्हणजेच गुरु दत्त यांच्या नातींना चित्रपटसृष्टीत आणलं आहे.
advertisement
6/10
गुरू दत्त यांची एक नात करुणा दत्त तिने अनुराग कश्यपसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या ती विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ब्लॅक वॉरंट सीझन 2 या वेब सिरीजमध्ये काम करत आहे.
advertisement
7/10
गुरू दत्त यांची दुसरी नात गौरी दत्त तिने इंटीरियर डिझाईनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. नितीन कक्करसह अनेक दिग्दर्शकांसोबत तिने काम केलं आहे.
advertisement
8/10
सध्या ती जाहिरातींमध्ये झळकत आहे. लवकरच ती दक्षिण भारतीय दिग्दर्शक अँथनी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.
advertisement
9/10
गौरीने सांगितलं की तिचे आजोबा गुरु दत्त प्रवास करताना नातेवाईकांना पत्र लिहायचे. त्यातील एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं, "काम मोठं किंवा लहान नसतं, काम म्हणजे फक्त काम असतं. जे काम करत नाहीत ते मूर्ख ठरतात." आजोबांची ही शिकवण मी कधीच विसरणार नाही असं गौरी म्हणते.
advertisement
10/10
करुणा आणि गौरी या दोघींनीही गुरु दत्त यांच्या चित्रपटांचे रिमेक करण्यास नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आजोबांनी जे चित्रपट बनवले ते त्यावेळच्या भावविश्वाशी जोडलेले होते आणि त्यांचा तोच गाभा जपला गेला पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guru Dutt Granddaughter : गुरू दत्तच्या नातींना पाहिलंय! एक करतेय सुपरहिट वेब सीरिज, दुसरी करतेय साऊथमध्ये डेब्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल