'घटस्फोटाच्या दिवशीच मला डेटवर बोलावलं...', 'हॅरी पॉटर' फेम अभिनेत्रीचा डोनाल्ड ट्रम्पबद्दल धक्कादायक खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Emma Thompson-Donald Trump : हॅरी पॉटर चित्रपटातील हॉलिवूड अभिनेत्री एम्मा थॉम्पसनने खुलासा केला की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला डेटवर येण्यासाठी विचारलं होतं.
advertisement
1/7

मुंबई: 'हॅरी पॉटर' चित्रपटातील कुरळ्या केसांची आणि जाड चष्मा लावणाऱ्या जादूगार शिक्षिकेची भूमिका साकारणारी हॉलिवूड अभिनेत्री एम्मा थॉम्पसन नेहमीच चर्चेत असते.
advertisement
2/7
आता तिने लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या राजकारणाचा इतिहासच बदलला असता, असं ती म्हणाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला डेटवर येण्यासाठी विचारलं होतं, असं एम्माने सांगितलं.
advertisement
3/7
ही घटना १९९८ सालची आहे, जेव्हा एम्माचा तिचा पती केनेथ ब्रानाघसोबत घटस्फोट झाला होता. त्या दिवशी ती 'प्रायमरी कलर्स' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्हॅनमध्ये बसली होती. तिच्या व्हॅनमध्ये असलेला लँडलाइन फोन कधीच वाजला नव्हता. पण अचानक त्याच दिवशी तो वाजला.
advertisement
4/7
एम्माने फोन उचलला, पलीकडून आवाज आला, "हॅलो, मी डोनाल्ड ट्रम्प बोलतोय." एम्माला वाटलं की कोणीतरी तिची मस्करी करत आहे. म्हणून तिने विचारलं, "मी तुम्हाला काही मदत करू शकते का?"
advertisement
5/7
तेव्हा ट्रम्प म्हणाले, "मला वाटतंय की तुम्ही माझ्या सुंदर ठिकाणी येऊन राहावं. आपण डिनरला जाऊ शकतो." हे ऐकून एम्माने विनम्रपणे उत्तर दिलं, "ही खूप चांगली गोष्ट आहे, थँक्यू, मी नंतर तुमच्याशी बोलेन."
advertisement
6/7
एम्माने नंतर सांगितलं की, "मला नंतर कळालं की तो फोन खरोखरच ट्रम्प यांचा होता. त्यावेळी ट्रम्प यांचाही त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. त्यांनी माझ्याकडे विचारणा केल्यामुळे मला वाटलं, की त्यांनी मला डेटसाठी विचारलं आहे."
advertisement
7/7
एम्माने पुढे हसत हसत एक मोठी गोष्ट सांगितली, "मी जर ट्रम्प यांच्यासोबत डेटवर गेले असते, तर कदाचित मी अमेरिकेचा इतिहास बदलला असता."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'घटस्फोटाच्या दिवशीच मला डेटवर बोलावलं...', 'हॅरी पॉटर' फेम अभिनेत्रीचा डोनाल्ड ट्रम्पबद्दल धक्कादायक खुलासा