TRENDING:

प्रसिद्ध अभिनेत्रीचं किडनॅप, शुटिंगच्या बहाण्याने पतीनेच साधला डाव, Shocking आहे कारण!

Last Updated:
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या विभक्त पतीनेच मुलीचा ताबा मिळवण्यासाठी भर दिवसा अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
advertisement
1/9
प्रसिद्ध अभिनेत्रीचं किडनॅप, शुटिंगच्या बहाण्याने पतीनेच साधला डाव, शॉकिंग कारण
बंगळूरू: चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या विभक्त पतीनेच मुलीचा ताबा मिळवण्यासाठी भर दिवसा अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमधील बंगळूरू शहरात उघडकीस आला आहे.
advertisement
2/9
पती-पत्नीमधील वैवाहिक वाद टोकाला गेल्यामुळे पतीने हे कृत्य केल्याचं बोलले जात आहे. या अभिनेत्रीचे नाव चैत्रा आर. असून, तिच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उजेडात आली.
advertisement
3/9
चैत्रा आणि तिचा पती हर्षवर्धन यांचे लग्न २०२३ मध्ये झाले होते, पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. हर्षवर्धन हा चित्रपट निर्माता असून, तो 'वर्धन एन्टरप्रायझेस'चा मालक आहे.
advertisement
4/9
वादांमुळे ते दोघे वेगळे राहू लागले. चैत्रा आपल्या एका वर्षाच्या मुलीसोबत मागाडी रोडवरील भाड्याच्या घरात राहायला गेली आणि तिने मालिकांमध्ये काम करणे सुरू ठेवले.
advertisement
5/9
हा सगळा कट पतीने मुलीच्या ताबा मिळवण्यासाठी रचला होता. ७ डिसेंबर रोजी चैत्राने तिच्या कुटुंबाला सांगितले की, ती एका शूटिंगसाठी म्हैसूरला जात आहे. पण, खरं तर हा हर्षवर्धनने तिच्या अपहरणासाठी केलेल्या प्लॅनचा भाग होता.
advertisement
6/9
तक्रारीनुसार, हर्षवर्धनने त्याचा साथीदार कौशिक याला २० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. कौशिकने अन्य एका व्यक्तीच्या मदतीने चैत्राला म्हैसूर रोड मेट्रो स्टेशनजवळ सकाळी ८ वाजता बोलावले आणि तिथून तिला जबरदस्तीने एका कारमध्ये NICE रोडमार्गे बिदाडीच्या दिशेने नेले.
advertisement
7/9
सकाळी सुमारे १०.३० वाजता, चैत्राने कसाबसा तिचा मित्र गिरीशला कॉल करून आपल्या अपहरणाची माहिती दिली. गिरीशने लगेच चैत्राच्या कुटुंबाला हा धक्कादायक प्रकार सांगितला.
advertisement
8/9
संध्याकाळपर्यंत, हर्षवर्धनने चैत्राची आई सिदम्मा यांना फोन केला आणि अपहरण केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने एक थरकाप उडवणारा अल्टिमेटम दिला. तो म्हणाला, "मी सांगतो त्या ठिकाणी बाळ घेऊन या, नाहीतर चैत्राला विसरा!" त्याने नंतर दुसऱ्या एका नातेवाईकाला फोन करून मुलीला आर्सीकेरे येथे घेऊन यायला सांगितले आणि चैत्राला सुरक्षित सोडण्याचे आश्वासन दिले.
advertisement
9/9
या घटनेनंतर टिपटूर आणि बंगळूरूमध्ये असलेले चैत्राचे कुटुंब त्वरित एकत्र आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. चैत्राच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्रीचं किडनॅप, शुटिंगच्या बहाण्याने पतीनेच साधला डाव, Shocking आहे कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल