TRENDING:

Dharmendra - Hema Malini : खासदार अन् अभिनेत्रीच नाही हेमा मालिनी बायको म्हणूनही नंबर 1, पत्नीचा त्याग सांगताना धर्मेंद्र झाले होते भावुक

Last Updated:
Dharmendra - Hema Malini : धर्मेंद्र यांनी पहिलं लग्न झालेलं असताना हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी या एक अभिनेत्री आणि खासदार म्हणून कायम पहिल्या स्थानावर राहिल्या आहेत. फक्त अभिनेत्री आणि खासदार म्हणूनच नाही तर हेमा मालिनी पत्नी म्हणूनही कायम पहिल्या स्थानावर राहिल्या आहेत. हेमा यांच्या त्यागाबद्दल बोलताना धर्मेंद्र देखील भावुक झाले होते.
advertisement
1/7
हेमा मालिनी बायको म्हणूनही नंबर 1, पत्नीचा त्याग सांगताना धर्मेंद्र झालेले भावुक
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारांनंतर त्यांना घरी आणण्यात आलं आहे. त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टर सध्या त्यांच्या लक्ष ठेवून आहेत.
advertisement
2/7
धर्मेंद्र आजारी असल्यापासून त्यांची मुलं झोपलेली नाहीत असं त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सांगितलं. मी कमजोर पडू शकत नाही असंही त्या म्हणाल्या.
advertisement
3/7
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी मोठ्या पडद्यावर कायमच हिट ठरली पण खऱ्या आयुष्यात दोघांनी अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. प्रेमापासून लग्नापर्यंत आणि त्यानंतर संसार करताना हेमा यांनी धर्मेंद्र यांना खूप मोलाची साथ दिली.
advertisement
4/7
हेमा मालिनी यांचं बसंतीसारखं प्रेम सगळ्यांनी पाहिलं आहे पण त्यांनी आयुष्यात धर्मेंद्रसाठी केलेला त्याग फार कमी लोकांना माहिती आहे. धर्मेंद्र यांनी स्वत: हेमा यांचं कौतुक केलं होतं.
advertisement
5/7
एका मुलाखतीत हेमा मालिनी यांच्याबद्दल बोलताना अभिनेते धर्मेंद्र भावुक झाले होते. ते म्हणाले होते, "हेमा तुला माझ्या फिलिंग्स जाणून घ्यायच्या आहेत की तुझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या व्यक्तिंना माझ्या तुझ्या प्रती असलेल्या फिलिंग्ज जाणून घ्यायच्या आहेत?"
advertisement
6/7
फिल्म जीना इसी का नाम हे च्या सेटवर धर्मेंद्र म्हणाले होते, "मला वाटलं माझं हृदय डोळ्यांमध्ये वसलं आहे, जे सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट सांगतात. मी इतके वर्ष अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं पण हेमासारखी सुंदर अभिनेत्री मी आतापर्यंत पाहिली नाही."
advertisement
7/7
ते पुढे म्हणाले होते, "तू सौम्यतेचं प्रतीक आहेस. तू अनेक हिट फिल्म्समधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, अनेक शानदार फिल्म्स केल्या. कधी कोणतीही मागणी केली नाहीस, कोणालाही दुखावलं नाहीस. तू खूप मोठा त्याग केलास… फक्त एकदा नाही तर अनेक वेळा तुझ्या भावनांचा त्याग करून इतरांना प्रेम आणि आदर दिलास.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra - Hema Malini : खासदार अन् अभिनेत्रीच नाही हेमा मालिनी बायको म्हणूनही नंबर 1, पत्नीचा त्याग सांगताना धर्मेंद्र झाले होते भावुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल