Horror Movie: खतरनाक हॉरर सिनेमा, फक्त 25 थिएटरमध्ये झाला रिलीज, पाहून लोकांची झोपच उडाली
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Horror Movie: हॉरर चित्रपटांची मजा वेगळीच असते. कॉमेडी, अॅक्शन किंवा रोमॅन्सपेक्षा हॉरर प्रेक्षकांना थरार देतो. पण काही चित्रपट इतके भीतीदायक असतात की ते एकट्याने पाहणे जवळजवळ अशक्य वाटते.
advertisement
1/7

हॉरर चित्रपटांची मजा वेगळीच असते. कॉमेडी, अॅक्शन किंवा रोमॅन्सपेक्षा हॉरर प्रेक्षकांना थरार देतो. पण काही चित्रपट इतके भीतीदायक असतात की ते एकट्याने पाहणे जवळजवळ अशक्य वाटते. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो पाहून लोक महिनाभर झोपले नाहीत.
advertisement
2/7
हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 51 वर्षे झाली तरी त्याची दहशत अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. गुगलवर "सर्वात भयानक चित्रपट" शोधल्यास आजही हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर दिसतो.
advertisement
3/7
आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे, 'द एक्सॉर्सिस्ट'. हा सिनेमा एका निष्पाप 12 वर्षांच्या मुलीवर आधारित आहे, जिला एक दुष्ट आत्मा पछाडतो. तिचे वागणे दिवसेंदिवस विचित्र होत जाते.
advertisement
4/7
“द एक्सॉर्सिस्ट” हा फक्त सिनेमागृहात भीती निर्माण करणारा चित्रपट नव्हता, तर त्याच्या शूटिंगदरम्यानही अनेक विचित्र घटना घडल्या.सेटवर अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. काही क्रू मेंबर्सच्या मृत्यूच्या घटना घडल्या.
advertisement
5/7
थिएटरमध्ये चित्रपट पाहताना अनेकांना धक्का बसला, काहींना तर हृदयविकाराचा झटका आला. यामुळे हा चित्रपट शापित (Cursed Movie) मानला जाऊ लागला.
advertisement
6/7
त्यातील भयानक दृश्यांमुळे आयर्लंड, इंग्लंड आणि स्कॉटलंडसह अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही तो प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.
advertisement
7/7
"द एक्सॉर्सिस्ट" फक्त हॉरर नाही तर बॉक्स ऑफिसवरही ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाचं बजेट 104.96 कोटी होतं आणि याची कमाई तब्बल 3,858,94 कोटी झाली होती. IMDb वर या चित्रपटाला 8.2 रेटिंग मिळाले आहे. एवढ्या वर्षांनंतरही हा सिनेमा हॉरर लव्हर्ससाठी कल्ट क्लासिक मानला जातो. आजही तुम्ही हा भयानक चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Horror Movie: खतरनाक हॉरर सिनेमा, फक्त 25 थिएटरमध्ये झाला रिलीज, पाहून लोकांची झोपच उडाली