Sarang - Paula : आधी नाही नाही म्हणाले, मग 12 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सारंग -पॉलाने कसा घेतला लग्नाचा निर्णय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता सारंग साठ्ये आणि पॉला यांनी 12 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर दोघांनी त्यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/9

सारंग आणि पॉला यांनी 28 सप्टेंबरला कॅनडामध्ये लग्न केलं. एबीपी माझीशी बोलताना लग्न करण्याचा निर्णय घेण्याबाबत बोलताना पॉला म्हणाली, "माझ्या आई-वडिलांचा डिवोर्स झालेल्या त्यामुळे मला लग्न करायचं नव्हतं एक दिवस अमेरिकेहून भारतात येत होतो. तेव्हा आम्ही आकाशात होतो आणि इराणमध्ये 300 मिसाइन डागले. आम्ही इराक वरून जाताना प्लेन पुन्हा माघारी परतलं. आम्ही घाबरलो."
advertisement
2/9
सारंगने सांगितलं, "कोणालाही त्रास झाला असता जेव्हा खालून मिसाईन चालले आहेत. आपण प्लेनमध्ये आहोत काय होईल काय नाही माहिती नाही."
advertisement
3/9
पॉला म्हणाली, "मी जेव्हा पॅरिसला पोहोचले तेव्हा विचार करू लागले की, असं काही घडलं तर आम्ही दोघं एका देशात नसू, मी भरतात परत जाऊ शकत नसेल आणि तो माझ्याकडे येऊ शकत नसेल. "
advertisement
4/9
"तेव्हा आम्ही ठरवलं की फक्त एका कागदपत्राचीच गोष्ट आहे तर तो कागद आपल्याला एक कपल म्हणून सर्वाधिकार देत असेल तर काय हरकत आहे."
advertisement
5/9
सारंग साठ्येनं एक प्रसंग सांगितला, "तो आमचा फर्स्ट हॅन्ड एक्सपिरीयन्स होता. असे प्रसंग ऐकलेले असतात पण पहिल्यांदा ते अनुभवात होतो. मी तेव्हा इकडे दिन दिन दिवाळी गाणं शूट करत होतो."
advertisement
6/9
"पॉला रात्री येणार होती आणि तीही या गाण्यात होती. पण ती त्यादिवसी पोहोचलीच नाही. तिचा काहीच मेसेज आला नाही."
advertisement
7/9
"पहाटे तिचा एक मेसेज आला. नो मॅटर व्हॉट रिमेंबर आय लव्ह यू. त्यावेळी मला दडपण आलं. हिला काही झालं आहे का? काय होतंय? त्यानंतर थोड्या वेळाने तिचा फोन आला. तेव्हा तीने सांगितलं आम्ही अवकाशात होतो, तेव्हा तो मेसेज पाठवला होता. भीती होती काय होईल."
advertisement
8/9
सारंग म्हणाला, "तेव्हा आम्हाला पहिल्यांदा जाणवलं की आम्ही दोन वेगळ्या देशातील लोक आहोत. आम्ही एका देशातील नाही, उद्या काही झालं, युद्ध वगैरे झालं किंवा कोणतीही घटना घडली तर तिचं सरकार किंवा आपलं सरकार आम्हाला एकमेकांकडे जाण्यासाठी मदत करेल."
advertisement
9/9
"आमच्याकडे कागदोपत्री काहीच प्रूफ नव्हता. त्यामुळे असं ठरलं की आपण कागद तरी तयार करूया. आपल्याला काय एक सहीच करायची आहे, इतका का अट्टाहास आहे, पुढे आपण एकत्र राहणार असू तर तसंच करूया त्यानंतर आम्ही निर्णय घेतला."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sarang - Paula : आधी नाही नाही म्हणाले, मग 12 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सारंग -पॉलाने कसा घेतला लग्नाचा निर्णय?