TRENDING:

'मी देश सोडतेय याचा अर्थ असा नाही की...', भारत सोडण्याबाबत इराणी अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, व्यक्त केला संताप

Last Updated:
Mandana Karimi leaving India: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदनाने भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/8
'मी भारत सोडतेय याचा अर्थ असा नाही की...', इराणी अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेत्री आणि एक्स बिग बॉस स्पर्धक मंदना करीमी सध्या आपल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदनाने भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/8
मात्र, "मी भारत सोडतेय याचा अर्थ असा नाही की मी इराणला परततेय," असे स्पष्ट करत तिने आपल्या आयुष्यातील एका वेदनादायी वास्तवाचा उलगडा केला आहे. सोशल मीडियावर इराणला परतण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत मंदनाने एका व्हिडिओद्वारे आपली बाजू मांडली.
advertisement
3/8
ती म्हणाली, "मीडियामध्ये माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मी इराणला परत जाऊच शकत नाही, कारण तिथल्या सरकारने १० वर्षांपूर्वीच माझ्यावर बंदी घातली आहे. इराणमध्ये सध्या युद्धाची परिस्थिती आहे आणि तिथे माझ्यासाठी मोठा धोका आहे."
advertisement
4/8
मंदनाचे संपूर्ण कुटुंब आजही इराणमध्ये आहे, मात्र तिथल्या ब्लॅकआउट आणि तणावामुळे तिचं कुटुंबाशी नीट बोलणं होऊ शकत नाहीये. तिने स्पष्ट केले की, ती इराणच्या स्वातंत्र्यासाठी बोलतेय, कारण तिचा जन्म आणि संगोपन तिथेच झाले आहे.
advertisement
5/8
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अलीकडेच अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतात काही ठिकाणी शोक व्यक्त करण्यात आला, ज्यावर मंदनाने नाराजी व्यक्त केली.
advertisement
6/8
तिने म्हटले, "गेल्या काही महिन्यांपासून मी इराणमधील अत्याचाराबद्दल ओरडून सांगत होते, तेव्हा भारतात मला कोणाचीच साथ मिळाली नाही. पण जसा खामेनेईंचा मृत्यू झाला आणि अमेरिका-इस्रायलचे नाव समोर आले, तसे इथल्या लोकांना मतं पडली. लोक रस्त्यावर येऊन खामेनेईंसाठी शोक व्यक्त करू शकतात, पण मी त्यांच्यासाठी शोक करू शकत नाही आणि करणारही नाही."
advertisement
7/8
इराणमधील राजवटीविरोधात उघडपणे बोलल्यामुळे मंदनाला सातत्याने धमक्या मिळत आहेत. त्यामुळे तिने गेल्या काही दिवसांपासून स्वतःला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. तिचे लोकेशन तिच्या जवळच्या मित्रांनाही माहित नाहीये. तरीही, इराणमधील लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी ती मीडियाशी संवाद साधत आहे.
advertisement
8/8
काही लोक मंदनाच्या करिअरवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यावर तिने सडेतोड उत्तर दिले. "मी गेल्या ६ वर्षांपासून चित्रपटात काम केलेले नाही, पण तो माझा स्वतःचा निर्णय होता. मी केवळ प्रसिद्धीसाठी हे करत नाहीये. मी इराणची नागरिक आहे आणि माझ्या देशात जे चाललंय त्यावर बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे," असे तिने ठणकावून सांगितले.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी देश सोडतेय याचा अर्थ असा नाही की...', भारत सोडण्याबाबत इराणी अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, व्यक्त केला संताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल