TRENDING:

'मी सगळं पणाला लावलं पण....', रणबीरसमोर ढसाढसा रडला होता आमिर खान, नेमकं काय घडलं होतं?

Last Updated:
Aamir Khan : अभिनेता रणबीर कपूरने आमिर खानबद्दल एक खूप मोठा आणि भावनिक खुलासा केला होता, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
advertisement
1/7
रणबीरसमोर ढसाढसा रडला होता आमिर खान, नेमकं काय घडलं होतं?
मुंबई: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान त्याच्या कामासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण त्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे.
advertisement
2/7
अभिनेता रणबीर कपूरने आमिर खानबद्दल एक खूप मोठा आणि भावनिक खुलासा केला होता, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आमिर खान त्याच्यासमोर ढसाढसा रडला आणि त्याने आपल्या आयुष्यातील काही कटू सत्य सांगितले.
advertisement
3/7
रणबीर कपूरने २०२४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी तो आमिर खानला भेटला होता. तेव्हा आमिर खान खूपच भावूक झाला होता आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू होते.
advertisement
4/7
या प्रश्नावर आमिर खानने जे उत्तर दिलं, ते ऐकून रणबीरही हळहळला. आमिर म्हणाला, “मी माझ्या आयुष्याची ३० वर्षं या कामात घालवली. आता जर माझं कुणासोबत नातं उरलं असेल, तर ती फक्त जनता आहे.”
advertisement
5/7
आमिर खान इथेच थांबला नाही. रडत-रडत तो पुढे म्हणाला, “माझं माझ्या मुलांसोबत आणि माझ्या आईसोबतही नातं नाही. माझी पत्नी किरण रावसोबतही माझं नातं नाही. आपलं हे काम असं आहे, जे तुमच्याकडून त्याग मागतं. तुम्हाला तुमचं सगळं काही पणाला लावावं लागतं.”
advertisement
6/7
आमिर खानने त्याच्या करिअरसाठी किती मोठा त्याग केला आहे, हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. या प्रसंगानंतर रणबीर कपूरही खूप भावनिक झाला होता.
advertisement
7/7
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, आमिर खान नुकताच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसला होता, तर दुसरीकडे, रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे आणि तो ‘रामायण’च्या पहिल्या भागाची शूटिंग करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी सगळं पणाला लावलं पण....', रणबीरसमोर ढसाढसा रडला होता आमिर खान, नेमकं काय घडलं होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल