आता फॅमिलीसाठी कार घेण्याची आली वेळ, Maruti ची मायलेज किंग SUV, फक्त 5 लाखांत!
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुती सुझुकीने सुद्धा आपल्या वाहनांच्या किंमती जाहीर केल्या आहे. जर तुम्ही फॅमिलीसाठी इतक्या दिवस ७ सीटर कार घेण्याचा विचार करत होते, तर ती वेळ आली आहे.
advertisement
1/7

महागाईच्या काळात केंद्र सरकारने अखेर जीएसटीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. आता २२ सप्टेंबरपासून २८ टक्के जीएसटी टॅक्स स्लॅब रद्द होणार आहे. यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये वाहनांच्या किंमतीत कमालीची कपात झाली आहे. मध्यमवर्गीयांची पहिली पसंती असलेल्या मारुती सुझुकीने सुद्धा आपल्या वाहनांच्या किंमती जाहीर केल्या आहे. जर तुम्ही फॅमिलीसाठी इतक्या दिवस ७ सीटर कार घेण्याचा विचार करत होते, तर ती वेळ आली आहे. कारण मारुतीची ७ सीटर गाडी आता फक्त ५ लाख १८ हजारात घरी येईल.
advertisement
2/7
भारतात ७-सीटर कारचा मोठा बोलाबाला आहे. अनेक ७-सीटर कारमध्ये कॅप्टन सीटसह ६-सीटर पर्याय देखील येतो. पण अलीकडेच मारुतीने ecco ही ६-सीटर कार लाँच केली होती. मारुतीने इकोचे ७-सीटर व्हर्जन बंद केलं आहे आणि त्याऐवजी ६-सीटर मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या कारमध्ये कॅप्टन सीट देखील आहे. त्यामुळे ७ जण बसू शकतात.
advertisement
3/7
दुसरीकडे, ५-सीटर मॉडेल सीएनजीसह समान राहील. ६ एअरबॅग्ज आता, मारुतीने केवळ ६-सीटर मॉडेल लाँच केले नाही. शिवाय, ब्रँडने इकोला पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित बनवले आहे.
advertisement
4/7
भारतातील सर्वात परवडणाऱ्या ७-सीटर किंवा इतर प्रकारांमध्ये आता ६-एअरबॅग्ज मिळतील. गेल्या काही महिन्यांपासून, मारुती त्यांच्या कारमध्ये फिटमेंट म्हणून 6-एअरबॅग्ज अपडेट करत आहे.
advertisement
5/7
आता किंमतीचा विचार केला तर बरेच बदल झाले. मारुती इकोची जेव्हा लाँच झाली होती तेव्हा किंमत मुंबईत ६.४१ लाख ते ७.४८ लाख रुपयांच्या दरम्यान होती. पण आता जीएसटीच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे याच इकोची किंमत फक्त ५ लाख १८ इतकी झाली आहे. या कारच्या किंमतीत ६८ हजार रुपये कपात करण्यात आली आहे.
advertisement
6/7
इको पूर्वीसारखाच आहे, मारुती इकोमध्ये १.२-लिटर एनए पेट्रोल इंजिन देईल जे ८० बीएचपी आणि १०४ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. कंपनी प्रायव्हेट आणि कार्गो प्रकारांमध्ये Eeco ची विक्री करते. ही MPV अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. डिलिव्हरी व्हॅन, स्कूल व्हॅन आणि अॅम्ब्युलन्स म्हणून ही 7 सीटर कार बाजारात खूप पसंत केली जाते.
advertisement
7/7
मारुती Eeco मध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 81 bhp पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. त्याचं मायलेज पेट्रोलमध्ये 19.71 किमी प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये 26.78 किमी प्रति किलो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता फॅमिलीसाठी कार घेण्याची आली वेळ, Maruti ची मायलेज किंग SUV, फक्त 5 लाखांत!