Ibrahim Ali Khan: इब्राहिम अली खानने दिली गुडन्यूज, 24 व्या वर्षी झाला 'वडील', घरी आली छोटी राजकुमारी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Ibrahim Ali Khan: सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे.
advertisement
1/7

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत असलेला इब्राहिम आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
advertisement
2/7
पण इब्राहिम यावेळी तो एका भावनिक आणि खूपच गोंडस कारणामुळे चाहत्यांच्या मनात घर करत आहे. इब्राहिम अली खानच्या घरी आली ‘छोटी राजकुमारी’ आली असून तो 24 व्या वर्षी वडील झाला आहे.
advertisement
3/7
इब्राहिमने घरी आलेल्या चिमुकल्या राजकुमारीचं नाव 'बांबी खान' ठेवलंय. ही चिमुकली पाहुणी एक गोंडस लहान पिल्लू आहे. इब्राहिमने एक भावनिक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली.
advertisement
4/7
इब्राहिमने एक सुंदर आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, एका शूटिंगच्या वेळी, तो सेटवर बसलेला असताना, बांबी तिथे आली आणि सरळ त्याच्या मांडीवर जाऊन बसली. तो क्षणच असा होता की जणू दोन जुने जीव पुन्हा एकत्र आले. त्या दिवसापासून आजपर्यंत बांबी आणि इब्राहिम यांचं नातं घट्ट होत गेलं.
advertisement
5/7
इब्राहिमने लिहिलं, "ती माझ्या मांडीवर आली आणि माझ्या आयुष्याचा एक भाग बनली. आता ती माझ्यासाठी फक्त एक कुत्री नाही, ती माझी मुलगी आहे." हे वाचून चाहत्यांच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
6/7
बांबीला घरी आणण्याचा निर्णय इब्राहिमसाठी सोपा नव्हता. त्याने उघड केलं की त्याची आई, अभिनेत्री अमृता सिंग यांना पाळीव प्राणी घरी आणायचा नव्हता. त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिला होता.
advertisement
7/7
पण इब्राहिमने हार मानली नाही. त्याने बांबीला घरी आणण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि शेवटी, आईचं मन वळवण्यात तो यशस्वी ठरला. आज बांबी संपूर्ण घराचा लाडका भाग बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ibrahim Ali Khan: इब्राहिम अली खानने दिली गुडन्यूज, 24 व्या वर्षी झाला 'वडील', घरी आली छोटी राजकुमारी!