Prajakta Shukre: 'इंडियन आयडॉल'ची रनरअप आता बिग बॉसच्या घरात! मराठमोळ्या प्राजक्ता शुक्रेचं कंगना राणौतशी खासं कनेक्शन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre: आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला कित्येक वर्षांपूर्वी वेड लावणाऱ्या प्राजक्ता शुक्रेचं बॉलिवूडची 'पंगा गर्ल' कंगना राणौतसोबत खास कनेक्शन आहे.
advertisement
1/7

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व सुरू झालं आणि घराघरांत एकाच नावाची चर्चा रंगली आहे. रितेश देशमुखच्या या महालात यंदा रील स्टार्सपासून ते तगड्या अभिनेत्यांपर्यंत १७ जणांची मांदियाळी जमली आहे.
advertisement
2/7
पण या गर्दीत एक चेहरा असा आहे, जिच्या सुमधुर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला कित्येक वर्षांपूर्वी वेड लावलं होतं. ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे! पण तुम्हाला माहीत आहे का, प्राजक्ताचं आणि 'इंडियन आयडॉल' विजेता अभिजीत सावंतचं एक खूप जुनं आणि खास कनेक्शन आहे?
advertisement
3/7
जसा 'बिग बॉस'चा पहिला सीझन ऐतिहासिक होता, तसाच 'इंडियन आयडॉल'चा पहिला सीझनही देशाने डोक्यावर घेतला होता. २००४-०५ सालात जेव्हा अभिजीत सावंत पहिल्या सीझनचा विजेता झाला, तेव्हा त्याच्यासोबत त्याच मंचावर शेवटपर्यंत टक्कर देणारी स्पर्धक म्हणजे प्राजक्ता शुक्रे.
advertisement
4/7
प्राजक्ता त्या सीझनची टॉप फायनलिस्ट होती. अभिजीत आणि प्राजक्ता यांची मैत्री तेव्हापासूनची आहे. आज अभिजीत मराठी विश्वात लोकप्रिय आहे, तर प्राजक्तानेही आपल्या आवाजाच्या जोरावर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
5/7
प्राजक्ताला मराठी सिनेसृष्टीत 'धक्का गर्ल' असंही म्हटलं जातं. "इथून धक्का तिथून धक्का देतोस काय रे..." हे खळबळ उडवून देणारं गाणं प्राजक्तानेच तब्बल ११ वर्षांपूर्वी गायलं होतं. तिच्या या गाण्याने तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र नाचला होता.
advertisement
6/7
फक्त मराठीच नाही, तर बॉलीवूडमध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातील गाजलेलं 'डंकिला' हे गाणं प्राजक्ताच्याच आवाजातलं आहे.
advertisement
7/7
प्राजक्ता ही केवळ साधी गायिका नाही, तर ती एक सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. तिने रिक्रिएट केलेलं 'वल्हव रे नाखवा' हे गाणं आजही युट्यूबवर तुफान लोकप्रिय आहे. तिच्या गाण्यांना लाखो-करोडो व्ह्यूज मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Shukre: 'इंडियन आयडॉल'ची रनरअप आता बिग बॉसच्या घरात! मराठमोळ्या प्राजक्ता शुक्रेचं कंगना राणौतशी खासं कनेक्शन