TRENDING:

Theatre Releases This Week : या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होतायत 8 हिंदी-मराठी फिल्म, सातवी तर पाहाच

Last Updated:
Theatre Releases This Week : थिएटरमध्ये या आठवड्यात अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य फिल्म रिलीज होत आहेत.
advertisement
1/8
या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होतायत 8 हिंदी-मराठी फिल्म
वा वाथियार (Vaa Vaathiyaar) : 'वा वाथियार' ही फिल्म 14 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कार्थी स्टारर या तमिळ अॅक्शन-कॉमेडी फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा नालन कुमारसामी यांनी सांभाळली आहे. या फिल्ममध्ये कृती शेट्टी आणि राजकिरण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
2/8
द्रौपदी 2 (Draupathi 2) : 'द्रौपदी 2' ही तामिळ ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामा फिल्मदेखील याच आठवड्यात रिलीज होणार आहे. मोहन जी क्षत्रिय यांनी या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रिचर्ड ऋषी आणि रक्षणा इंदुसन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
3/8
अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई : केदार शिंदे दिग्दर्शित 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई' हा सिनेमा 16 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक मनोरंजक व कौटुंबिक चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा चित्रपट घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे.
advertisement
4/8
राहु केतु (Rahu Ketu) : 'राहु केतु' ही कॉमेडी फिल्म 16 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या फिल्ममध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि शालिनी पांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
5/8
हॅपी पटेल - खतरनाक जासूस : 'हॅपी पटेल-खतरनाक जासूस' या फिल्मचं दिग्दर्शन कवी शास्त्री यांनी केलं आहे. या सिनेमात वीर दास मुख्य भूमिकेत आहेत. तर आमिर खान दुहेरी भूमिकेत आहे. 16 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
advertisement
6/8
बिहू अटॅक : बिहू अटॅक ही फिल्म 16 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या फिल्ममध्ये अरबाज खान, देव मेनारिया, डेजी शाह आणि राहुल देव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/8
मायासभा-द हॉल ऑफ इल्यूजन : 'मायासभा-द हॉल ऑफ इल्यूजन' ही सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे. 16 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म रिलीज होत आहे.
advertisement
8/8
वन टू चा चा चा : 'वन टू चा चा चा' ही फिल्म 16 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये आशुतोष राणा, ललित प्रभाकर आणि अनंत जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Theatre Releases This Week : या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होतायत 8 हिंदी-मराठी फिल्म, सातवी तर पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल