Zubeen Garg Death : मौत को छूकर टक्क... 23 वर्षापूर्वीही झाला होता जुबिन गर्गचा भयानक अपघात, मृत्यूला दिली होती हुलकावणी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zubeen Garg Death : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबिन गर्ग यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. पण तुम्हाला माहितीये का, जुबिनच्या आयुष्यात अशीच एक दुर्दैवी घटना २३ वर्षांपूर्वी घडली होती.
advertisement
1/7

मुंबई: ‘या अली’ या गाण्याने देशभरात सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबिन गर्ग यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
जुबिनचा मृत्यू सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात झाला, पण तुम्हाला माहितीये का, जुबिनच्या आयुष्यात अशीच एक दुर्दैवी घटना २३ वर्षांपूर्वी घडली होती, ज्यात त्याने त्याच्या सख्ख्या बहिणीला गमावलं होतं.
advertisement
3/7
जुबिनची बहीण जोंगकी बोरठाकुर ही सुद्धा एक उत्तम गायिका होती. १२ जानेवारी २००२ रोजी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात तिचं निधन झालं.
advertisement
4/7
तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. जोंगकी तिच्या भावाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होती, तेव्हाच तिची कार एका ट्रकवर आदळली.
advertisement
5/7
या घटनेतील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, याच गाडीत जुबिन गर्गही प्रवास करत होता, पण अपघात होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तो दुसऱ्या गाडीत बसला होता, ज्यामुळे तो वाचला. जुबिनसाठी ही घटना खूपच भयानक होती, ज्यात त्याने त्याच्या सख्ख्या बहिणीला गमावलं होतं.
advertisement
6/7
जुबिन गर्ग फक्त एक गायकच नव्हता, तर तो एक उत्तम अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकही होता. त्याने कन्नड, मल्याळम, मराठी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
advertisement
7/7
त्याच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ आणि हृतिक रोशनच्या ‘क्रिश ३’ चित्रपटातील ‘दिल तू ही बता’ सारखी अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली होती. जुबिनच्या निधनामुळे संगीतक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Zubeen Garg Death : मौत को छूकर टक्क... 23 वर्षापूर्वीही झाला होता जुबिन गर्गचा भयानक अपघात, मृत्यूला दिली होती हुलकावणी