'तिचं खरं रूप...' काजोलच्या उद्धटपणाबद्दल मराठमोळ्या रेणुका शहाणे स्पष्ट बोलल्या
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Renuka Shahane on Kajol : रेणुका शहाणे यांना 'त्रिभंग' या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलसोबत खूप जवळून काम करता आलं आहे. आता काजोलच्या उद्धटपणावर रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

'त्रिभंग' हा हिंदी कौटुंबिक चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रेणुका शहाणे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 2021 मध्ये नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटात काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुका शहाणे यांना काजोलसोबत खूप जवळून काम करता आलं.
advertisement
2/7
तीन पिढ्यांमधील स्त्रियांच्या नात्यातील गुंतागुंतीवर आधारित असलेल्या 'त्रिभंग' या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती. तर अजय देवगण फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
advertisement
3/7
काजोलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी स्पष्टपणे तर कधी उद्धटपणे बोलताना काजोल दिसून येतो. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. आता लोकमतला दिलेल्या मुलाखतीत काजोलच्या उद्धटपणावर रेणुका शहाणे यांनी भाष्य केलं आहे.
advertisement
4/7
काजोल खरंच उद्धट आहे का? याबद्दल बोलताना आता रेणुका शहाणे म्हणाल्या," तिला जे लोक आवडत नाही त्यांच्याबद्दल आहे. त्यात काही वादच नाही. मला असं वाटतं की नैसर्गिक आहे. ती स्वत:ला फिल्टर करत नाही".
advertisement
5/7
रेणुका शहाणे म्हणाल्या,"ही किती चांगली गोष्ट आहे. कारण आपण सगळ्या लोकांना फिल्टरच पाहतो. ती तिचं जे खरं रूप आहे ते लोकांना दाखवण्यात कधीच मागे जा नाही. तिला त्याबद्दल असं काही वाटत नाही. लोक तिच्याबद्दल काहीही बोलतात पण तिला त्याचं काही वाटत नाही. मी आहे तशी आहे".
advertisement
6/7
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या,"त्रिभंग'च्या वेळेला माझं आणि काजोलचं नातं खूप घट्ट तयार झालं होतं. आजही आमचं नातं खूप घट्ट आहे. काजोल शिस्तीची मुलगी आहे. तिच्यासोबत काम करताना ती स्टार आहे असं ती वावरत नाही. किंवा 'त्रिभंग'च्यावेळी तिचंच प्रॉडक्शन होतं. पण तिने त्रास दिला नाही. एकदा तिने स्क्रिप्ट ऐकली, तिला पटलं आणि आवडलं की हजार टक्के ती तुम्हाला साथ देते".
advertisement
7/7
काजोलबद्दल बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या,"काजोल ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक अभिनेत्री आहे. तिला फार काही सांगावं लागत नाही. तिचं आकलन खूप आहे. लहानपणापासूनच तिने अनेक लोक पाहिले आहेत, परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे आयुष्यातील अनुभवांमुळे ती समुद्ध आहे".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तिचं खरं रूप...' काजोलच्या उद्धटपणाबद्दल मराठमोळ्या रेणुका शहाणे स्पष्ट बोलल्या