TRENDING:

Marathi Actress : गायिकेची झाली अभिनेत्री, 33 कोटींचा मराठी सिनेमा देऊन आली भारत सोडण्याची वेळ, पण का?

Last Updated:
कोण आहे ही प्रसिद्ध मराठी गायिका, जिला एक हिट सिनेमा केल्यानंतर देश सोडून जाण्याची वेळ आली. असं झालं काय होतं.
advertisement
1/10
गायिकेची झाली अभिनेत्री,33 Cr चा मराठी सिनेमा देऊन आली भारत सोडण्याची वेळ,पण का?
इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फक्त एकाच नाही तर अनेक क्षेत्रात आपलं कामावलं आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे उत्तम गायक आहेत. अनेक गायिका उत्तर डान्सर्स देखील आहेत. अनेक अभिनेत्री उत्तर गातात.
advertisement
2/10
अशीच एक प्रसिद्ध गायिका. जिनं आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं मात्र अचानक तिच्यातील अभिनयाची तिला जाणीव झाली आणि तिनं अभिनेत्री म्हणूनही पदार्पण केलं.
advertisement
3/10
तिचा पहिला सिनेमा हिट झाला. दुसरा सिनेमा तर सुपरडुपर हिट झाला. पण या सिनेमामुळे या गायिकेवर भारत सोडून जाण्याची वेळ आली. कोण आहे ही गायिका जी अभिनेत्री झाली. 
advertisement
4/10
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री आणि गायिका सारेगमप लिटिल चॅम्पमधून सर्वात आधी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केलं.
advertisement
5/10
 आपण बोलत आहोत केतकी माटेगावकर हिच्याबद्दल. केतकीनं 'शाळा' या सिनेमातून अभिनयनात पदार्पण केलं. त्यानंतर आलेल्या 'टाइमपास' सिनेमामुळे तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली. तिने या सिनेमात गाणी देखील गायली. ती देखील हिट झाली. सिनेमानं 33 कोटींची कमाई केली होती.
advertisement
6/10
'टाइमपास' सिनेमात केतकीनं साकारलेली प्राजू आजही तितकीच फेमस आहे. पण या सिनेमानं तिला दिलेली प्रसिद्धी अनेकदा तिच्यासाठी डोकेदुखी ठरली.
advertisement
7/10
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना केतकीनं सांगितलं, "प्राजक्ता हे पात्र खूप फेमस झालं. अनेकांना हे पात्र खरं वाटायचं. मुलांचे लग्नासाठी फोन यायचे. माझ्या वडिलांच्या अकाऊंटवर मेसेज करायचे. मुलांचे डायोडेटा, पत्रिका पाठवायचेय."
advertisement
8/10
"आमचा मुलगा आयटीमध्ये आहे, इंजिनिअर आहे असं म्हणत लग्नाची मागणी घालायचे. या सगळ्या मला आणि कुटुंबाला प्रचंड त्रास झाला. क्लासला जातना अनेकदा मुलं मागे लागायची त्यामुळे बाबा मला सोडायला यायचे."
advertisement
9/10
या सगळ्या त्रासाला कंटाळून केतकीचं पुढचं शिक्षण परदेशात करायचं असं तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं. त्यामुळे केतकी पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तिथे ती एक सामान्य नागरिक म्हणून जगत होती. तिथे तिला कोणीही ओळखत नव्हतं.
advertisement
10/10
'टाइमपास' बरोबरच केतकीनं 'शाळा', 'काकस्पर्श', 'फुंतरू', 'तानी' सारख्या मराठी सिनेमांतही काम केलं आहे. केतकीनं काही महिन्यांआधी संगीतकार ए आर रहमान यांच्या शोमध्ये प्री परफॉर्मन्सही दिला.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : गायिकेची झाली अभिनेत्री, 33 कोटींचा मराठी सिनेमा देऊन आली भारत सोडण्याची वेळ, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल