23 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशननंतर सेलिब्रिटी कपलने बांधली लग्नगाठ, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितलं लग्न करण्याचं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
celebrity Wedding: टेलिव्हिजनच्या विश्वातील एका लोकप्रिय जोडीने तब्बल २३ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर अखेर लग्न करून त्यांच्या प्रेमकथेला एक सुंदर नाव दिले आहे.
advertisement
1/7

मुंबई: टेलिव्हिजनच्या विश्वातील एका लोकप्रिय जोडीने तब्बल २३ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर अखेर लग्न करून त्यांच्या प्रेमकथेला एक सुंदर नाव दिले आहे.
advertisement
2/7
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत एकत्र दिसलेले अभिनेता संदीप बसवाना आणि अभिनेत्री अश्लेषा सावंत यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वृंदावनमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली.
advertisement
3/7
संदीप आणि अश्लेषा यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इतकी वर्षे एकत्र असूनही त्यांनी लग्न का केले नाही, याबद्दल संदीप बसवाना यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.
advertisement
4/7
संदीप म्हणाले, "अश्लेषा आणि मी एप्रिलमध्ये वृंदावनला गेलो होतो. तिथे राधा-कृष्णाच्या मंदिरांमध्ये आम्हाला एक वेगळाच अनुभव आला, एक मजबूत कनेक्शन जाणवले. तिथे गेल्यावरच आम्हाला २३ वर्षांनंतर लग्न करण्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली. आमच्या कुटुंबीयांनाही याच क्षणाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती."
advertisement
5/7
दोघांनाही हा विवाहसोहळा खूप साधा ठेवायचा होता. त्यामुळे वृंदावनच्या चंद्रोदय मंदिरात केवळ कुटुंबातील खास लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना यांच्या वयात सहा वर्षांचे अंतर आहे. मात्र, या वयाच्या अंतराचा त्यांच्या प्रेमाच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही.
advertisement
6/7
लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना या जोडप्याने एक सुंदर पोस्ट लिहिली, "आणि बस, अशा प्रकारे आम्ही एका नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे, मिस्टर आणि मिसेस... परंपरांनी आमच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे." अश्लेषा सावंतनेही वृंदावन हे त्यांच्या लग्नासाठी परफेक्ट ठिकाण असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.
advertisement
7/7
या जोडप्याने शेअर केलेल्या कोलाब पोस्टमध्ये त्यांचे अनेक सुंदर फोटो आहेत. लग्नात अश्लेषा सावंत गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत आहे, तर संदीप बसवाना शुभ्र पांढऱ्या कुर्त्या-पायजम्यात खूप डॅशिंग दिसत आहेत. या टीव्ही कपलने अतिशय सुंदर प्रकारे २३ वर्षे आपले नाते जपले आणि आता ते अधिकृतपणे पती-पत्नी बनले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
23 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशननंतर सेलिब्रिटी कपलने बांधली लग्नगाठ, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितलं लग्न करण्याचं कारण