TV मालिका गाजवली, सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड; मराठमोळा अभिनेता थेट करणार बॉलिवूड डेब्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी टेलिव्हिजन आणि मराठी रुपेरी पडदा गाजवून आता अभिनेता थेट बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या सिनेमाचं पहिलं पोस्टरही समोर आलं आहे.
advertisement
1/10

मराठी कलाकार</a> बॉलिवूडमध्येही काम करत आहेत. असाच एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. " width="750" height="501" /> अनेक मराठी कलाकार बॉलिवूडमध्येही काम करत आहेत. असाच एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
2/10
या अभिनेत्यानं मराठी टेलिव्हिजनवर हिट मालिका दिली आहे. मराठी टेलिव्हिजवचा हँडसम हंक हिरो म्हणून तो ओळखला जातो.
advertisement
3/10
मालिका केल्यानंतर तो मराठी सिनेमांकडे वळला. सुरुवातीला त्याच्या अभिनयाची जादू फार चालली नाही. मात्र एक सिनेमा त्याच्या आयुष्यात आला आणि त्याचं नशीबच बदललं.
advertisement
4/10
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच ललित प्रभाकर. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ललितनं टेलिव्हिजनवर डेब्यू केला. त्याची पहिलीच मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ही मालिका युट्यूबवर आवडीनं पाहिली जाते.
advertisement
5/10
त्यानंतर ललितने 'आनंदी गोपाळ', 'चि. व चि.सौ.कां', 'कलरफुल', 'झोंबिवली' आणि 'मिडियम स्पाइसी' सारख्या सिनेमात काम केलं. आनंदी गोपाळ या सिनेमाला 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 57वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नॉमिनेशनही मिळालं होतं.
advertisement
6/10
हाच ललित प्रभाकर आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'वन टू चा चा चा' या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अभिषेक ठाकूर आणि रजनीश ठाकूर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
7/10
या सिनेमात ललित प्रभाकर आशुतोष राणा, अभिमन्यू सिंह, हर्ष मायरा, नायरा बॅनर्जी, अनंत वी.जोशी आणि मुकेश तिवारी या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.
advertisement
8/10
'वन टू चा चा चा' हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. ललितचा पहिला हिंदी सिनेमा कसा असणार याकडे त्याच्या चाहत्यांचंही लक्ष लागून आहे.
advertisement
9/10
त्याआधी येत्या 12 सप्टेंबरला ललितचा 'आरपार' हा नवा मराठी सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात तो अभिनेत्री हृता दुर्गुळेबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.
advertisement
10/10
त्याचप्रमाणे त्याला 'प्रेमाची गोष्ट 2' हा सिनेमा देखील 22 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV मालिका गाजवली, सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड; मराठमोळा अभिनेता थेट करणार बॉलिवूड डेब्यू