प्रेमाचा आवाज असणाऱ्या लता मंगेशकर यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, नाहीतर आज असत्या राजघराण्याच्या महाराणी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Lata Mangeshkar Incomplete Love Story : लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका प्रश्नाने त्यांच्या चाहत्यांना नेहमीच सतावलं - लतादीदींनी लग्न का केलं नाही?
advertisement
1/7

मुंबई: स्वरसम्राज्ञी आणि भारत रत्न लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या जादूने जगभरातील कोट्यवधी लोकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांनी ३६ हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आणि हिंदीत १००० हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला.
advertisement
2/7
त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्न या सर्वोच्च सन्मानांनी गौरवलं गेलं. पण, लतादीदींच्या वैयक्तिक आयुष्यातील एका प्रश्नाने त्यांच्या चाहत्यांना नेहमीच सतावलं - लतादीदींनी लग्न का केलं नाही?
advertisement
3/7
लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा झाल्या आहेत. माहितीनुसार, लतादीदी डूंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर खूप प्रेम करत होत्या. राज सिंह हे लतादीदींचे धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्रही होते.
advertisement
4/7
पण, हे प्रेम कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. यामागे एक भावनिक कारण होतं. राज सिंह यांनी त्यांच्या आई-वडिलांना वचन दिलं होतं की, ते कोणत्याही सामान्य घरातील मुलीला त्यांच्या घराण्याची सून करणार नाहीत. राज यांनी आपलं हे वचन मरणापर्यंत पाळलं आणि ते देखील लतादीदींप्रमाणे आयुष्यभर अविवाहित राहिले.
advertisement
5/7
राज सिंह लतादीदींपेक्षा ६ वर्षांनी मोठे होते. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती आणि ते अनेक वर्ष बीसीसीआयशी जोडले गेले होते.
advertisement
6/7
राज सिंह लतादीदींना प्रेमाने ‘मिट्ठू’ म्हणायचे. त्यांच्या खिशात नेहमी एक टेप रेकॉर्डर असायचा, ज्यात लतादीदींची निवडक गाणी असायची. १२ सप्टेंबर २००९ रोजी राज सिंह यांचे निधन झाले.
advertisement
7/7
दुसरीकडे, लतादीदी यांचं म्हणणं होतं की, त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. लहान वयातच वडिलांचं छत्र हरवल्याने त्यांना कुटुंबासाठी आणि भावंडांच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडावं लागलं होतं. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा त्याग केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेमाचा आवाज असणाऱ्या लता मंगेशकर यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, नाहीतर आज असत्या राजघराण्याच्या महाराणी