बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे या समितीचे प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक मुद्द्यांवर आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये तात्विक सहमती झाली आहे. केवळ काही मुद्द्यांवर मतभेद असल्याने ते समन्वय समितीपुढे ठेवण्यात येणार आहेत. समितीतील चर्चा आणि विचारविनिमयानंतर अंतिम स्वरूपात जाहीरनाम्याला मंजुरी दिली जाईल.
दरम्यान, या कॉमन जाहीरनाम्याअंतर्गत “अति पिछडा संकल्प” हा महत्त्वाचा घटक आधीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी ठोस धोरणं राबवण्यावर या संकल्पात भर देण्यात आला आहे.
advertisement
इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात रोजगारनिर्मिती, शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय, आर्थिक विषमता कमी करणे, तसेच लोकशाही संस्थांचे संरक्षण या मुद्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. एकत्रित जाहीरनामा जाहीर करून आघाडी आपली एकजूट आणि समान दृष्टीकोन मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
आगामी काही दिवसांत समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचेल आणि नंतर बिहारमधील इंडिया आघाडीचा कॉमन मेनिफेस्टो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर निवडणूक प्रचाराला नवा वेग मिळण्याची अपेक्षा आहे. बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात वोट चोरी अभियाना मध्ये तसेच भारत न्याययात्रेमध्ये आलेल्या मुद्द्यांच्या आधारावर हा मॅनिफेस्टो तयार करण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली आहे.