Pune Weather: पुढील 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
1/7

उत्तरमध्य महाराष्ट्र आणि परिसरावरील कमी दाब प्रणालीने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी उत्तर कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे.
advertisement
2/7
उर्वरित कोकण, घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रात विजांसह, जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात रविवारी 36.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 23.9 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान घसरले. आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
रविवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 23.9 अंश सेल्सिअस इतके होते. तसेच वादळी वाऱ्यासह 15 मिलिमीटर पाऊस कोसळला. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज साताऱ्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 23 अंशावर राहिल. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट व्यक्त केला आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला अशातही 43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सीना आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये लाखात विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी वाढलेली असून यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता कायम आहे. आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस राहिल.
advertisement
7/7
सांगली जिल्ह्यातील बहुतांश परिसरास मागील 24 तास पावसाने उघडीप दिली. यावेळी कमाल तापमान 26.7 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील 48 तास राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather: पुढील 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, 3 जिल्ह्यांना अलर्ट