लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? तिच्या मृत्यूनंतर खचला अभिनेता, दागिन्यांसह दिला होता अग्नी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
laxmikant berde first wife : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमांविषयी आजवर अनेकदा बोललं गेलं आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीविषयीच्या काही न माहिती असलेल्या गोष्टी पाहूयात.
advertisement
1/9

मराठी सिनेसृष्टीतील हास्यसम्राट दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं करिअर जितकं यशस्वी होतं तितकंच त्यांच्या खासगी आयुष्यातही अनेक भावनिक वळणे होती.
advertisement
2/9
त्यांची पत्नी प्रिया अरुण यांच्याबद्दल अनेकांनी माहिती आहे. प्रिया आजही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीबद्दल माहिती आहे का? त्यांच्या पहिल्या पत्नीचा त्यांच्या करिअरमधील यशात मोलाचा वाटा होता.
advertisement
3/9
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुही बेर्डे असं आहे. त्याही सुंदर आणि उत्तम अभिनेत्या होत्या. त्यांचं खरं नाव पद्मा असं होतं. अभिनयाच्या दुनियेत त्या 'रुही' या नावाने ती ओळखल्या जात होत्या.
advertisement
4/9
त्या मूळच्या मुंबईतील होत्या. त्यांच्या अभिनयाची सुरुवात हिंदी चित्रपट ‘आ गले लग जा’ मधून केली होती, ज्यात त्यांनी शत्रुघ्न सिन्हाच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
advertisement
5/9
रुही यांनी आपली कारकीर्द नाटकांतून सुरू केली. त्यांचं 'डार्लिंग डार्लिंग' हे नाटक खूप गाजलं. त्यानंतर 1973 मध्ये त्यांनी 'जावई विकत घेणे आहे' या मराठी सिनेमातून चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं. दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली.
advertisement
6/9
लक्ष्मीकांत आणि रुहीची पहिली भेट ही ‘वेडी माणसं’ या नाटकाच्या सेटवर झाली होती. त्या नाटकात काम करत असताना दोघांचं ओळखीतून प्रेमात रूपांतर झालं.
advertisement
7/9
1983 मध्ये त्यांनी लग्न केला. लग्नानंतर लक्ष्मीकांत यांच्या करिअरला झपाट्याने गती मिळाली. रुहीने देखील अभिनय थांबवून कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं.
advertisement
8/9
लग्नानंतरचा दोघांचा संसार सुरळीत चालला होता. पण नियतीला काही मान्य नव्हतं. एक दिवस अंधेरी येथे गाडीने प्रवास करत असताना रुहीला अचानक ब्रेन हॅमरेजचा झटका आला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवस उपचारांनंतर 5 एप्रिल 1998मध्ये त्यांचं निधन झालं.
advertisement
9/9
लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं की, "रुही ही लक्ष्या साठी खरंच लक्ष्मी होती. तिच्या जाण्याने लक्ष्या खचून गेला होता तो इतका की नंतर त्याने कधीच उभारी धरली नाही. तो बरेच दिवस मित्रांशी बोलतच नव्हता. रुही गेल्यावर समशानभूमीत अग्नी देताना तिच्या अंगावरचा एकही अलंकार न काढू देणारा लक्षा, तिच्या पार्थिवासमोर निशब्द उभा होता.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? तिच्या मृत्यूनंतर खचला अभिनेता, दागिन्यांसह दिला होता अग्नी