TRENDING:

तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय? 138 मिनिटांची ही फिल्म पाहा, जाणून घ्या लॉयल्टी चेक करण्याचा फंडा

Last Updated:
Bollywood Movie : बॉलिवूडमध्ये अशा अनेक फिल्म्स बनल्या आहेत ज्या कपलच्या लॉयल्टीवर आधारित आहेत. या फिल्म्स पाहण्याचा एक फायदा असा की यातून तुम्हाला हे समजण्यात सोपे जाते की तुमचा पार्टनर तुम्हाला चीट तर करत नाही ना.
advertisement
1/7
तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय? 138 मिनिटांची ही फिल्म पाहा
बॉलिवूडमध्ये अशा अनेक फिल्म्स बनल्या आहेत ज्या कपलच्या लॉयल्टीवर आधारित आहेत. या फिल्म्स पाहण्याचा एक फायदा असा आहे की यातून हे समजण्यास सोपं जातं की तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत आहे का नाही. मग तुम्ही लग्न केलेले असाल किंवा रिलेशनशिपमध्ये, लॉयल्टी चेक करणाऱ्या फिल्म्स पाहण्यात काहीच वाईट नाही.
advertisement
2/7
कारण आजच्या काळात कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवणं योग्य नाही. सोशल मीडियावर रिलेशनशिपबद्दल इतकं काही घडतंय की अनेकांचे संसारही बिघडले आहेत. अशा वेळी आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय का? याचा तुम्हाला अंदाज येईल.
advertisement
3/7
'लव्हयापा' असं या चित्रपटाचं नाव आहे. जो यावर्षी व्हॅलेंटाइन डे आधी म्हणजे 7 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
advertisement
4/7
'लव्हयापा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत चंदन यांनी सांभाळली होती. कथेची गोष्ट अशी की हा चित्रपट दिल्लीतील गौरव (जुनैद) आणि बानी (खुशी) या जोडप्यावर आधारित आहे.
advertisement
5/7
गौरव आणि बानी या दोघांची सोशल मीडियावर ओळख होते आणि बराच काळ ते एकमेकांना डेट करतात. या काळात ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील केमिस्ट्री खूपच सुंदर असते. पण अचानक त्यांच्या आयुष्यात असा ट्विस्ट येतो की त्यांचं 'बाबू-शोना' प्रेम भांडणात बदलतं.
advertisement
6/7
फिल्मचा पहिला भाग 'लव्हयापा' आहे तर दुसऱ्या भागात तो 'लव्ह + सियापा' बनतो. जेव्हा त्यांची गोष्ट लग्नापर्यंत पोहोचते, तेव्हा बानीचे वडील दोघांसमोर अशी एक अट ठेवतात, ज्यामुळे त्यांच्या खऱ्या प्रेमाचे स्तर उघड होऊ लागतात.
advertisement
7/7
अट अशी की दोघांना 24 तासांसाठी एकमेकांचे मोबाइल फोन एक्सचेंज करायचे आहेत. दोघांसाठी हे करणं कठीण होतं, पण लग्नासाठी त्यांनी ही डील मान्य केली. या 24 तासांत दोघांच्या फोनवर असे-असे मेसेज येतात की त्यांचं प्रेम हळूहळू संपत जातं आणि त्यांच्या मध्ये वादच वाद होऊ लागतात. चित्रपटात ड्रामासोबत कॉमेडीचाही तडका आहे. ‘लव्हयापा’ हा साऊथच्या ‘लव्ह-टुडे’ या चित्रपटाचा हिंदी रीमेक असल्याचं सांगितलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय? 138 मिनिटांची ही फिल्म पाहा, जाणून घ्या लॉयल्टी चेक करण्याचा फंडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल