मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून ही दोन्ही मुलं घरी दिसली नाहीत. हे आईच्या लक्षात येताच तिने तातडीने जुन्नर पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
मुलं खेळायला जात असलेल्या भागात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्याने, पोलिसांच्या मदतीला वनविभागालाही पाचारण करण्यात आलं. पोलीस पथक, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने ड्रोनचा वापर करून शोधकार्य जलद गतीने सुरू करण्यात आलं. शोधादरम्यान, शेततळ्याच्या काठावर लहान मुलांचे बूट आणि चप्पल दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर तळ्यात तपास केला असता, रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही भावंडांचे मृतदेह आढळून आले.
advertisement
काय म्हणावं यांना! बिबट्याआधी माणसंच उचलतायेत पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी; वनविभागही हैराण
त्यांना तात्काळ बाहेर काढून जुन्नर रेस्क्यू टीमच्या ॲम्ब्युलन्समधून शिवछत्रपती रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहिद हसन यांनी तपासणी करून, मुलांचा मृत्यू बुडाल्यामुळे सुमारे चार तासांपूर्वीच झाल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.
या दोन निष्पाप मुलांच्या मृत्यूमुळे इनामदार कुटुंब पूर्णपणे खचून गेलं आहे. मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले आहेत, त्यामुळे मुलांची जबाबदारी आई आणि आजीवर होती. आफान तिसरीमध्ये तर रिफत पहिलीमध्ये शिकत होती . खेळायला गेलेल्या मुलांचे मृतदेहच तळ्यात आढळल्याने नातेवाईकांमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
