काय म्हणावं यांना! बिबट्याआधी माणसंच उचलतायेत पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी; वनविभागही हैराण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चक्क बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाचीच चोरी होऊ लागली आहे. या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे
पुणे : जिल्ह्यातील अनेक तालुके आणि गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक घटनांमध्ये बिबट्याने प्राण्यांसोबतच माणसांवरही हल्ले करून जीवही घेतले आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्यांना लवकराच लवकर जेरबंद करावं अशी मागणी नागरिक सतत करत आहेत. मात्र, आता आंबेगाव तालुक्यातून असा प्रकार समोर येत आहे, ज्यामुळे वनविभागही हैराण झाला आहे
आंबेगाव तालुक्याच्या मंचर वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे, या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. मात्र, आता चक्क बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाचीच चोरी होऊ लागली आहे. या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. हे सर्व चित्र पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.
advertisement
आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यातच आता ऊसतोड सुरू असल्याने अनेकांना दिवसाढवळ्या बिबटे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. त्यामुळे, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाचीच चोरी होण्याच्या घटना समोर येत असल्याने आता अधिकारीही हैराण झाले आहेत.
advertisement
2 दिवसांपूर्वी अवसरी बुद्रुक इथल्या वरचा हिंगे मळा जाणाऱ्या रस्त्याजवळ वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यात कोंबडी ठेवण्यात आली होती. पण अज्ञात चोरट्याने बिबट्या जेरबंद होण्याआधीच ती कोंबडी लंपास केली. याशिवाय जवळच असलेल्या गावडेवाडी या गावामध्ये, बैलगाडा घाटाजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
काय म्हणावं यांना! बिबट्याआधी माणसंच उचलतायेत पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी; वनविभागही हैराण


