Madhuri Dixit : ...अन् माधुरीचे केसच जळाले; ऐन दिवाळीत धकधक गर्लसोबत घडली होती भयंकर घटना
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ऐन दिवाळीत माधुरीसोबत भयंकर प्रसंग घडला होता. त्यामुळे माधुरी आजही दिवाळीत फटाके फोडत नाही.
advertisement
1/8

दिवाळी आणि दिवाळीत घडलेले अनेकांचे अनेक किस्से आहेत. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील तिची दिवाळीची एक आठवण शेअर केली.
advertisement
2/8
पण ही आठवण डोकं चक्रावणारी आहे. दिवाळी सेलिब्रेट करताना माधुरीला मुंडण करण्याची वेळ आली होती.
advertisement
3/8
माधुरीने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, बालपणी आपल्या मित्रांबरोबर दिवाळी साजरी करताना फटाके उडवायचो. एकदा एका मित्राने तिच्या हातात एक फटाका ठेवला.
advertisement
4/8
माधुरीला तो व्यवस्थित पकडता आला नाही आणि फटाका अचानक हातातच फुटला. माधुरीचे केस जळाले.
advertisement
5/8
तिच्या आई-वडिलांना नाइलाजास्तव माधुरीचं मुंडन केलं. फटाक्यांमुळे केस जळून जाणं आणि त्यानंतर मुंडण करण्याची वेळ येणं हे खूप शॉकिंग होतं.
advertisement
6/8
माधुरीला तिचे लांबसडक काळेभोर केस परत मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागली. तोपर्यंत तिचे आई वडिलही चिंतेत होते.
advertisement
7/8
माधुरीने पुढे सांगितलं, "त्या धक्कादायक अनुभवानंतर मी दिवाळीत फटाके उडवणंच सोडून दिलं. मी दिवाळीत पुन्हा कधीच फटाके उडवले नाही."
advertisement
8/8
तो धक्कादायक प्रसंगाचा माधुरीच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आजही ती दिवाळी साजरी करताना फार सुरक्षिततेनं साजरी करते. ती तिच्या मुलांनाही फटाके उडवताना सावधान रहायला सांगते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : ...अन् माधुरीचे केसच जळाले; ऐन दिवाळीत धकधक गर्लसोबत घडली होती भयंकर घटना