TRENDING:

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे लाखो चाहते, पण 'धक धक गर्ल' मात्र या मराठी अभिनेत्रीच्या निखळ हास्यावर फिदा

Last Updated:
Madhuri Dixit Loved Marathi Actress Smile : माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना भुरळ पाडते. पण 'धक धक गर्ल' मात्र एका मराठी अभिनेत्रीच्या निखळ हास्यावर फिदा आहे.
advertisement
1/7
माधुरी दीक्षित या मराठी अभिनेत्रीच्या निखळ हास्यावर फिदा
धक धक गर्ल माधुरी दीक्षित आपलं सौंदर्य, हास्य आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. जगभरातील चाहत्यांना माधुरी आपल्या हास्याने वेड लावत असते. फक्त माधुरीच्या एका स्माईलसाठी तिची फिल्म पाहणारा मोठा वर्ग आहे. लाखो चाहत्यांना आपल्या स्माईलने वेड लावणारी माधुरी मात्र एका मराठी अभिनेत्रीच्या हास्यवर फिदा आहे.
advertisement
2/7
'हम आपके है कौन' या 1994 मध्ये गाजलेल्या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत मराळमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे झळकली होती. त्यानंतर 2018 मध्ये 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केलं. माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांची घट्ट मैत्री आहे.
advertisement
3/7
रेणुका शहाणे यांनी आपल्या सहज-सुंदर अभिनयाने आणि निखळ हास्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटांत त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या आहेत. रेणुका शहाणे यांचाही मोठा चाहतावर्ग आहे. 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितही रेणुका शहाणे यांची मोठी चाहती आहे.
advertisement
4/7
रेणुका शहाणे यांनी नुकतंच 'अभिजात मराठी ओटीटी'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी रेणुका शहाणे यांना प्रश्न विचारला गेला की, आम्ही असं ऐकलंय माधुरी दीक्षित या स्वत: तुमच्या हास्याच्या मोठ्या फॅन आहेत. अनेकदा त्यांनी हे सांगितलंदेखील आहे".
advertisement
5/7
रेणुका शहाणे उत्तर देत यावेळी म्हणाल्या,"हो. हे खरं आहे. माधुरी दीक्षितला माझं स्माईल खूप आवडतं. आम्हा दोघींच्या हास्यबद्दल जेव्हा लोक बोलायचे तेव्हा माधुरी नेहमीच म्हणायची, की हिचं स्माईल खूप छान आहे. माधुरी मला शहाणी म्हणते. या शहाणीचं स्माईल खूप गोड आहे, असं ती म्हणते".
advertisement
6/7
माधुरीबद्दल काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या,"माधुरीसोबत काम करणं हे खरोखर स्वप्नवत आहे. माधुरीसारख्या हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत काम करणं ही सोपी गोष्ट नव्हे. पण मला ते करता आलं आहे".
advertisement
7/7
रेणुका शहाणे पुढे म्हणालेल्या,"माधुरी दीक्षितला एक दिग्दर्शक म्हणून मला पाहायचं आहे. एक चांगली संहिता मिळाल्यानंतर मी स्वत: माधुरीसोबत संपर्क साधेल". माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे पुन्हा एकत्र कधी झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे लाखो चाहते, पण 'धक धक गर्ल' मात्र या मराठी अभिनेत्रीच्या निखळ हास्यावर फिदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल