Mrs Deshpande नाही सीरियल किलर! कधी आणि कोणत्या OTT वर रिलीज होणार माधुरीची क्राइम-थ्रिलर सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mrs Deshpande Release Date : माधुरी दीक्षित 'मिसेज देशपांडे' या नव्या सीरिजच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या ही बहुप्रतीक्षित सीरिज कधी आणि कुठे पाहता येईल.
advertisement
1/7

बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याने जगभरातील आपल्या चाहत्यांना घायाळ करत आहे. गेल्या काही दशकांपासून माधुरी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतेय. आजही अभिनेत्री लगादार वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
2/7
माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी वेब सीरिजची हिंट दिली होती. 'मिसेज देशपांडे' असं या सीरिजचं टायटल आहे. अशातच आज माधुरी दीक्षितने आपल्या आगामी 'मिसेज देशपांडे' या सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. त्यामुळे आता माधुरीची आगामी सीरिज कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
advertisement
3/7
माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'मिसेज देशपांडे' या सीरिजचा एक टीझरदेखील अभिनेत्रीने शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्रीचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. अशातच आता नवा टीझर शेअर करत अभिनेत्री रिलीज डेट जाहीर केली आहे.
advertisement
4/7
'मिसेज देशपांडे'च्या नव्या टीझरमध्ये माधुरी दीक्षित एखाद्या सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे भाजी चिरताना दिसत आहे. अशातच रेडिओवरील बातम्यांमध्ये ऐकू येतं की आठ मर्डर करुनही पोलिस आरोपिला पकडू शकलेले नाहीत. त्यानंतर माधुरीच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन पाहायला मिळतात.
advertisement
5/7
माधुरी दीक्षितची 'मिसेज देशपांडे' ही सीरिज फ्रेंच थ्रिलर 'ला मांटे'ची ऑफिशियल रिमेक आहे. या फ्रेंच थ्रिलरची गोष्ट एका सीरियल किलरच्या अवतीभोवती फिरणारी आहे.
advertisement
6/7
माधुरी दीक्षितची 'मिसेज देशपांडे' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा नागेश कुकुनूर यांनी सांभाळली आहे. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि कुकुनूर मूव्हीजच्या बॅनरअंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
7/7
माधुरी दीक्षितची बहुप्रतीक्षित 'मिसेज देशपांडे' ही सीरिज प्रेक्षकांना येत्या 19 डिसेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mrs Deshpande नाही सीरियल किलर! कधी आणि कोणत्या OTT वर रिलीज होणार माधुरीची क्राइम-थ्रिलर सीरिज