TRENDING:

Vanita Kharat : 'कोळीवाड्याची रेखा' ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर; काय त्या पोझेस, काय ती स्टाईल! फॅन्स घायाळ, PHOTO

Last Updated:
Vanita Kharat Photoshoot at Australia Street : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनितानं केलेलं फोटोशूट पाहिलं का?
advertisement
1/9
'कोळीवाड्याची रेखा' ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर; काय त्या पोझेस, काय ती स्टाईल! फॅन्स घायाळ, PHOTO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही लोकप्रिय टेलिव्हिजन कॉमेडी शोची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण टीम कामासोबतच ऑस्ट्रेलियातील विविध ठिकाणांचा आनंदही घेत आहे.
advertisement
2/9
या दौऱ्यातील कलाकारांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून  मोठी पसंती मिळत आहे.
advertisement
3/9
या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत आली आहे 'कोळीवाड्याची रेखा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री वनिता खरात. तिचे ऑस्ट्रेलियातील काही खास फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
advertisement
4/9
विशेष म्हणजे वनिताने ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर उभं राहून केलेलं फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडलं आहे.वनिताने निळ्या रंगाचा वन पीस परिधान करत हे फोटोशूट केलं आहे.
advertisement
5/9
वनिताच्या बोल्ड फेशियल एक्सप्रेशन्स, कॉन्फिडन्ट पोझेस आणि वेगळी स्टाईल यामुळे ती अधिकच उठून दिसत आहे. "पुन्हा माझ्याकडे बघा, मी वेगळी दिसतेय," असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/9
वनिताच्या डिफरंट लुकवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ओंकार राऊतने "हो हो, खूपच डिफरंट" अशी कमेंट केली आहे.
advertisement
7/9
प्रियदर्शनी इंदलकर हिने "येस यू आर… तुझी पर्स पण!" असं म्हणत तिच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. ईशा डे हिने "ओहsss" अशी कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. 
advertisement
8/9
फक्त सेलिब्रिटीच नाही तर चाहत्यांनीही वनितावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "ही रिअल ब्युटी आहे. बोल्ड, कॉन्फिडन्ट आणि unapologetic".
advertisement
9/9
वनिता खरातने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता तिच्या या ग्लॅमरस आणि कॉन्फिडन्ट लुकमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vanita Kharat : 'कोळीवाड्याची रेखा' ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर; काय त्या पोझेस, काय ती स्टाईल! फॅन्स घायाळ, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल