TRENDING:

'आयुष्यात कोणाला किती महत्त्व द्यायचं...' वयाने मोठ्या मुलाच्या प्रेमात होती प्रियदर्शिनी इंदलकर, कसा झाला प्रेमकहाणीचा शेवट?

Last Updated:
Priyadarshini Indalkar Breakup: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या ब्रेकअपचा आणि त्यामागच्या संघर्षाचा धक्कादायक खुलासा केला असून, सोशल मीडियावर तिची ही कबुली सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
1/8
वयाने मोठ्या मुलाच्या प्रेमात होती प्रियदर्शिनी, कसा झाला लव्हस्टोरीचा शेवट?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने आख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
पडद्यावर नेहमी आनंदी दिसणाऱ्या प्रियदर्शनीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका कडू आठवणीचा पदर उलगडला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या ब्रेकअपचा आणि त्यामागच्या संघर्षाचा धक्कादायक खुलासा केला असून, सोशल मीडियावर तिची ही कबुली सध्या तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
3/8
प्रियदर्शनी सध्या तिच्या आगामी 'लग्नाचा शॉर्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिने स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमध्ये हजेरी लावली होती.
advertisement
4/8
गप्पांच्या ओघात जेव्हा तिला तिच्या 'रिलेशनशिप स्टेटस'बद्दल विचारलं, तेव्हा तिने आपण 'सिंगल' असल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. एप्रिल २०२५ मध्ये तिचं नातं तुटलं असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं.
advertisement
5/8
ब्रेकअपचं कारण सांगताना प्रियदर्शनी म्हणाली, "आमच्यात Compatibility नव्हती. मुख्य म्हणजे, त्याला लग्नाची खूप घाई होती, कारण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. पण माझं करिअर आता कुठे सावरतंय, त्यामुळे मला लग्नासाठी आणखी वेळ हवा होता. आमच्या विचारांत तफावत होती आणि वारंवार होणाऱ्या वादांमुळे मी स्वतः या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला."
advertisement
6/8
नात्यातील गुंतागुंतीबद्दल बोलताना प्रियदर्शनीने एक खूप महत्त्वाची गोष्ट मांडली. तिने सांगितलं की, तो किंवा ती स्वतः टॉक्सिक नव्हते, पण त्यांच्यातील परिस्थितीमुळे त्यांचं नातं मात्र पूर्णपणे बिघडलं होतं. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, यावरून दोघांची मतं न जुळल्याने एका सुंदर नात्याचा अंत झाला.
advertisement
7/8
खऱ्या आयुष्यात लग्नाच्या निर्णयावरून नातं तुटलेलं असतानाच, प्रियदर्शनी पडद्यावर मात्र 'लग्नाचा शॉर्ट' घेऊन येत आहे. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे.
advertisement
8/8
अक्षय गोरे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट लग्नाच्या भोवती फिरणाऱ्या गमतीजमतींवर आधारित आहे. या चित्रपटात प्रियदर्शनीसोबत अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आयुष्यात कोणाला किती महत्त्व द्यायचं...' वयाने मोठ्या मुलाच्या प्रेमात होती प्रियदर्शिनी इंदलकर, कसा झाला प्रेमकहाणीचा शेवट?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल