TRENDING:

प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन, 225 पेक्षा अधिक सिनेमांत केलंय काम

Last Updated:
Actor Director Passes Away : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकाचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 225 पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाचे निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मल्याळम अभिनेता-दिग्दर्शक श्रीनिवासन यांचे निधन झाले. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. श्रीनिवासन यांनी जवळपास 225 पेक्षा अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
advertisement
2/7
श्रीनिवासन हे कुन्नूरचे रहिवासी होते आणि गेल्या काही वर्षांपासून कोची येथे राहत होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या. उत्तम अभिनेता असण्यासोबतच श्रीनिवासन हे दिग्दर्शक आणि लेखकही होते.
advertisement
3/7
श्रीनिवासन यांनी सुमारे 225 हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली. श्रीनिवासन यांनी 1976 मध्ये ‘मणिमुझक्कम’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. विनीत आणि ध्यान ही त्यांची दोन मुलंदेखील अभिनयक्षेत्रात सक्रीय आहेत.
advertisement
4/7
श्रीनिवासन यांना आपल्या कारकिर्दीत एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर अवॉर्ड साउथ आणि सहा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ‘संदेशम’ आणि ‘मझायेथुम मुनपे’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.
advertisement
5/7
प्रियदर्शन, सत्यन अंथिकड आणि कमल हासन यांच्यासोबत त्यांनी वारंवार काम केले. मल्याळम कॉमेडी आणि सामाजिक नाट्याच्या सुवर्णकाळाला आकार देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सामान्य माणसांच्या भूमिका साकारताना त्यांच्या अभिनयात संयम, वास्तववाद आणि सूक्ष्म उपरोध दिसून येत असे.
advertisement
6/7
श्रीनिवासन यांनी 1976 मध्ये पी. ए. बाकर यांच्या ‘मणिमुझक्कम’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली आणि 1979 मध्ये ‘संघगानम’मध्ये मुख्य भूमिका साकारली. चेन्नई येथील तमिळनाडू फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील औपचारिक प्रशिक्षणामुळे लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या क्षेत्रांत त्यांच्या सशक्त कारकिर्दीची पायाभरणी झाली.
advertisement
7/7
श्रीनिवासन यांच्या निधनानंतर रजनीकांत, दुलकर सलमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन, 225 पेक्षा अधिक सिनेमांत केलंय काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल