TRENDING:

बाबांच्या बेडरूमपर्यंत का गेलात? फटके देऊन निघायचं होतं! अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

Last Updated:
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीची तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. ममता कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?
advertisement
1/7
बाबांच्या बेडरूमपर्यंत का गेलात? फटके देऊन निघायचं होतं! अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं प्रतिक्रिया दिली आहे. 
advertisement
2/7
ABP माझाशी बोलताना ममता कुलकर्णीला अशोक खरात प्रकरणाविषयी विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, "आपल्या घरात मुलींची लग्न असतात, पत्रिका दाखवायची असेल तर तिथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही थेट त्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये कसे जाता?" असा सवाल तिने उपस्थित केला.
advertisement
3/7
ती पुढे म्हणाली, "आपण मराठी आहोत. स्त्रियांमध्ये एक थर्ड व्हिजन असतं. त्यांना आतून कळतं की समोरचा माणूस कसा आहे, कसं बघतोय. त्यामुळे अशा परिस्थितीत स्त्रियांनी सावध राहायला हवं."
advertisement
4/7
"तुम्हाला वाटलं की तुम्ही निर्बल आहात तर तुम्ही त्याला फटके मारून तिथून बाहेर पडायला हवं होतं. त्यानंतर केस करायला हवी होती. पन्नास बायको वाचल्या असत्या" असंही ममता कुलकर्णी म्हणाली.
advertisement
5/7
ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात परतली. भारतात आल्यानंतर ती थेट कुंभमेळ्यात पोहोचली.  ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली.
advertisement
6/7
महामंडलेश्वर बनल्यानंतर तिने नावही बदललं होतं. तिला ममता नंद गिरी नावाने ओळखलं जात होतं. पण काही महिन्यातच ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला.
advertisement
7/7
महामंडलेश्वर पदाचा नाजीनामा दिल्यानंतर ममत कुलकर्णी बॉलिवूडमध्ये परतली आहे. काही दिवसांआधी ती रिअलिटी शोमध्ये झळकली होती. ममता येत्या काळात बॉलिवूड सिनेमात दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाबांच्या बेडरूमपर्यंत का गेलात? फटके देऊन निघायचं होतं! अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल