TRENDING:

रेखाचा 'जिगरी दोस्त', ज्याने अमिताभ बच्चन यांचीही उडवलेली झोप; बॉक्स ऑफिस हादरवून सोडलं होतं

Last Updated:
Actor : रेखाचं नाव नेहमी अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं जातं. पण अमिताभ यांच्याशिवाय आणखी एक सुपरस्टार ज्याच्याशी रेखाची खूप घट्ट मैत्री राहिली आहे. रेखाने या मित्रासोबत तब्बल 40 वर्षे बॉलिवूडमध्ये कामही केलं आहे. या हिरोने हिट फिल्मे देऊन बिग बींची झोप उडवली होती.
advertisement
1/9
रेखाचा 'जिगरी दोस्त', ज्याने अमिताभ बच्चन यांचीही उडवलेली झोप; बॉक्स ऑफिस हादरवून सोडलं होतं
बॉलिवूडमधील रिलेशनशिपचं म्हणाल तर अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाचीही चर्चा होते. पण रेखाची घनिष्ठ मैत्री मात्र एका वेगळ्याच अभिनेत्यासोबत होती. हा अभिनेता म्हणजे रेखाचा जिगरी दोस्त होता.
advertisement
2/9
या अभिनेत्याचा जन्म 1942 मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता. कित्येक फिल्म स्टुडिओ आणि प्रोड्युसरकडे ते आर्टिफिशिअल ज्वेलरीसाठी जायचे. हा अभिनेता आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांची मदत करायचा. याचवेळी अभिनेत्याची भेट व्ही. शांताराम यांच्याशी झाली.
advertisement
3/9
चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनीच या अभिनेत्याला चित्रपटांमध्ये आणलं. त्याने हिरोईनच्या बॉडी डबल आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. 1964 साली रिलीज झालेल्या 'गीत गया पत्थारों ने' या फिल्ममधून व्ही. शांताराम यांनी आपली मुलगी राजश्रीसोबत या अभिनेत्याला यांना लाँच केलं आणि इथून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
advertisement
4/9
या अभिनेत्याने त्याच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत 200 हून अधिक फिल्ममध्ये काम केलं. त्यातील बहुतेक फिल्म्स हिट झाल्या. कित्येकदा त्याने अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा अशा त्या काळातील सुपरस्टार्सनाही मागे टाकलं.  1967 साली प्रदर्शित झालेली फिल्म या अभिनेत्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे ते एक मोठे स्टार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
5/9
1973 मध्ये बॉलिवूडला अमिताभ बच्चन यांच्या रूपाने एक नवीन सुपरस्टार मिळाला. तेव्हा राजेश खन्ना यांची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली, पण जितेंद्र या अभिनेत्याची लोकप्रियता तशीच राहिली. धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच ते एक सदाबहार अभिनेते राहिले. 1976 मध्ये ते 'बॉक्स ऑफिसचे बादशाह' ठरले.
advertisement
6/9
हा अभिनेता आहे जितेंद्र. 1976 मध्ये प्रदर्शित झालेली त्याची फिल्म  त्यांचा 'नागिन' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 1977 मध्ये जितेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांनाही कडवी टक्कर दिली. 'धर्म-वीर' या चित्रपटाने खळबळ उडवून दिली.  1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जानी दुश्मन' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं.
advertisement
7/9
जितेंद्र यांनी 'हिम्मतवाला' आणि 'तोहफा' सारख्या चित्रपटांमध्ये जया प्रदा आणि श्रीदेवीसोबत काम केलं. या दोन चित्रपटांनी त्याचे नशीब पालटले. हे चित्रपट अशा वेळी आले, जेव्हा बॉक्स ऑफिसवर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता ओसरू लागली होती.
advertisement
8/9
जितेंद्रची रेखासोबतची मैत्री खूप घट्ट होती. रेखा आणि श्रीदेवी यांंचं खूप चांगलं जमत होतं. सुरुवातीला रेखानेच श्रीदेवीच्या हिंदी चित्रपटांना डब केलं होतं. जितेंद्र यांनी रेखाच्या सांगण्यावरूनच श्रीदेवीसोबत काम केल्याचं त्यांनीच एका मुलाखतीत उघड केलं होतं.
advertisement
9/9
जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर. पण ते त्यांच्या अनोख्या अभिनय आणि नृत्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांना 'जंपिंग जॅक' हे टोपणनाव मिळालं. तर रेखा त्यांना 'रविया' म्हणत असत. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रेखाचा 'जिगरी दोस्त', ज्याने अमिताभ बच्चन यांचीही उडवलेली झोप; बॉक्स ऑफिस हादरवून सोडलं होतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल