'आमिर खान माझ्या घरी यायचा, बेडरूममध्ये...', ममता कुलकर्णीने 30 वर्षांनी केला मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mamta Kulkarni On Aamir Khan : 1995 साली आलेल्या बाजी फिल्ममध्ये ममता कुलकर्णाी आणि आमिर खान यांनी एकत्र काम केलं होतं. त्यावेळचा किस्सा तिने आता एका मुलाखतीत सांगितला आहे.
advertisement
1/7

ममता कुलकर्णी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. पण खूप वर्षांपूर्वी तिने बॉलीवूड सोडलं. गेल्या वर्षी ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. तिने तिचं नाव बदलून श्री श्री यमाई ममता नंद गिरी असं ठेवलं. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली ज्यात तिने आमिर खानबाबत मोठा खुलासा केला आहे.
advertisement
2/7
ममता म्हणाली, "मी 90 च्या दशकात काम केल्याबद्दल खूप भाग्यवान आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीच असा विचार केला नव्हता. मी आमिर खानसोबत काम केलं आहे, मी शाहरुख खानसोबत काम केलं आहे. आम्ही कधीही एकमेकांच्या धर्माबद्दल विचार केला नाही. प्रामाणिकपणे, आता मी काय म्हणू? त्या काळातील फिल्म सेट आजच्यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्हते."
advertisement
3/7
ममता कुलकर्णीने बाजी फिल्ममध्ये आमिर खानसोबत काम केलं होतं. तिने त्यावेळच्या काही गोष्टी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
advertisement
4/7
पुढे ती म्हणाली, तेव्हा व्हॅनिटी व्हॅन सामान्य नव्हत्या, त्यावेळी कलाकार एकमेकांच्या घरी जाणं पसंत करायचे. बाजी फिल्मच्या शूटिंगवेळी आमिर खान अनेकदा माझ्या घरी यायचा, माझ्या बेडरूममध्ये कपडे बदलायचा. कारण त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या. 'जर व्हॅन असेल तर मी तिथे कपडे बदलेन' असं नव्हतं. जर आमिर खान लोखंडवालामध्ये शूटिंग करत असेल तर तो थेट माझ्या घरी येऊन माझ्या बेडरूममध्ये कपडे बदलायचा."
advertisement
5/7
ममता कुलकर्णी म्हणाली, "आम्ही एकमेकांच्या घरी जायचो, तिथं तयारी करायचो आणि मग थेट शूटिंगला जायचो. 'बाजी'चं काम संपल्यानंतर मी आणि आमिर खान थेट माझ्या घरी यायचो आणि तो माझ्या स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायचा."
advertisement
6/7
जेव्हा ती आमिर खान आणि शाहरुख खानसोबत परदेशात जायची तेव्हा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवरही हीच जवळीक दिसून येत असे, असंही तिने सांगितलं.
advertisement
7/7
ए.आर. रहमान यांच्या जातीयवादी विधानावर ममता कुलकर्णीने ही प्रतिक्रिया दिली आहे. तिने 90 च्या दशकातील बॉलिवूडच्या वातावरणाबद्दल भाष्य केलं. तिने त्या काळातील चित्रपटांच्या सेटवरील आरामदायी आणि मैत्रीपूर्ण वातावरणाबद्दल सांगितलं. जे सध्याच्या काळाच्या अगदी उलट होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आमिर खान माझ्या घरी यायचा, बेडरूममध्ये...', ममता कुलकर्णीने 30 वर्षांनी केला मोठा खुलासा