अभिनेता पुष्कर जोगचा मोठा निर्णय! भारताला रामराम? UAE ला शिफ्ट होण्याचा निर्णय, सांगितलं कारण
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगनं चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. पुष्करला UAE मध्ये गोल्डन व्हिसा मिळाला आहे. तो UAE ला का शिफ्ट झाला याचं कारणही त्याने सांगितलंय. 
advertisement
1/6

 बिग बॉस मराठीचा स्पर्धक आणि अभिनेता पुष्कर जोगचा 'ह्युमन कोकेन' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची त्याने काही दिवसांआधीच घोषणा केली. सिनेमातील कलाकारांचे खतरनाक लुक रिव्हिल करण्यात आले आहेत.
advertisement
2/6
 पुष्करने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने UAE मध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय का घेतला हे देखील पोस्टमध्ये सांगितलं आहे.
advertisement
3/6
 पुष्करने अचानक भारत सोडून UAE ला शिफ्ट होण्याचा निर्णय ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काहींनी त्याला ट्रोल केलं आहे तर काहींनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
advertisement
4/6
 पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळाला. आता मी अधिकृतपणे UAE चा रहिवासी झालो आहे. हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे, तिच्या भविष्यासाठी. धन्यवाद आई-बाबा, धन्यवाद डॉ. अमोल सुहास जोग आणि गॉड. आभारी आहे."
advertisement
5/6
 पुष्कर गेली अनेक महिने विदेशात सिनेमा शूट करत आहे. त्याने अनेक सिनेमे हे विदेशात शूट करण्यात आलेत. त्याचा आगामी ह्युमन कोकेन हा सिनेमा देखील युनायटेड किंगडममध्ये शूट करण्यात आला आहे. पुष्करचा 'ह्युमन कोकेन' हा सिनेमा 16 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
advertisement
6/6
 पुष्करचं सोशल मिडिया हँडल चेक केलं तर तो गेली काही वर्ष त्याच्या फॅमिलीसह दुबईत राहत असल्याचं दिसत आहे. Golden Visa UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती सरकारने (UAE Government) सुरू केलेली एक विशेष निवासी योजना आहे. गोल्डन व्हिसाच्या माध्यमातून दुसऱ्या देशातून आलेल्या नागरिकांना UAE मध्ये दीर्घकालीन राहण्याची परवानगी मिळते. ही परवानगी 5-10 वर्षांसाठी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेता पुष्कर जोगचा मोठा निर्णय! भारताला रामराम? UAE ला शिफ्ट होण्याचा निर्णय, सांगितलं कारण