TRENDING:

MPSC Success Story: नशीबानं राबवलं अन् रडवलंही, 6 मुख्य परीक्षा 5 मुलाखती थोडक्यात हुकलं यश, हार न मानता झाला Class 1 अधिकारी

Last Updated:
MPSC Success Story: नांदेडचे ओमकेश जाधव सातत्याने 6 वेळा अपयश आल्यानंतरही हार न मानता अखेर MPSC राज्यसेवा 2024 मध्ये 54 वा क्रमांक मिळवून CLASS1 अधिकारी झाले.
advertisement
1/6
6 मुख्य परीक्षा 5 मुलाखती थोडक्यात हुकलं यश, हार न मानता झाला Class 1 अधिकारी
यशाची खरी किंमत त्याला विचारा, ज्याच्या हातून एकदा नाही तर 6 वेळा परीक्षा देऊनही मनासारखं यश न मिळाल्याने क्लास वन अधिकाऱ्याचं पोस्टिंग हुकलं आहे. सतत येणाऱ्या अपयशानंतरही हार न मानता पुन्हा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नासमोर अखेर नशीबाचंही काहीही चाललं नाही. नशीबालाही अखेर साथ द्यावी लागली. नांदेडच्या या तरुणाची कहाणी प्रेरणादायी आहे.
advertisement
2/6
नांदेडचे ओमकेश जाधव झाला CLASS1 अधिकारी झाले आहेत आहे. सलग 6 मुख्य आणि 5 मुलाखत PostalAssistant, तलाठी, सरकारी कामगार अधिकारी, उपशिक्षण अधिकारीपदी निवड पण मनाशी ठरवलेलं ध्येय म्हणजे class1 ऑफिसर होतं.
advertisement
3/6
नशिबानी राबवलं अन् रडवलं, अगदी थोडक्यात Class 1 पासून हुकवलं पण तुझी अपार मेहनत आणि जिद्द पाहून शेवटी नशीबानं पण नांग्या टाकल्या अन् ते class1 झाला. MPSC राज्यसेवा 2024 मध्ये महाराष्ट्रात 54 वा क्रमांक पटकवून तो अधिकारी झाला. त्याच्या यशाचं कौतुक नांदेडमध्ये होत आहे.
advertisement
4/6
क्लास वन अधिकारी झाल्यानंतर ओमकेश यांनाही अश्रू अनावर झाले. आईच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. त्यांच्या आईचाही कंठ दाटून आला होता. 6 वेळा परीक्षा दिल्यानंतर त्या मेहनतीचं अखेर चीज झालं याचा आनंद गगनात मावणारा नव्हता.
advertisement
5/6
ओमकेश म्हणतात की, इथे श्रीमंत, गरीब, तोंडाच चांदीचे चमचे घेऊन आलेले या कोणाचाच टिकावं लागत नाही, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याचा टिकाव या स्पर्धेत लागतो. आयुष्यातली सर्वात महत्त्वाची उमेदिची वर्ष तुम्ही पणाला लावत असता. त्यामुळे त्यात हार न मानता आणि ध्येय पक्क ठेवून मेहनत घेत राहायचं असतं.
advertisement
6/6
तुम्ही टाइमपास किंवा कोणताही प्लॅन न करता जर परीक्षा देत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे. व्यवस्थित नियोजन करून तयारी करायला हवी. भल्याभल्याना इथे रँकिंग मिळवण्यात अडचणी येतात. त्यामुळे मेहनत, जिद्द आणि कष्ट फार महत्त्वाचे आहेत असं ओमकेश यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
MPSC Success Story: नशीबानं राबवलं अन् रडवलंही, 6 मुख्य परीक्षा 5 मुलाखती थोडक्यात हुकलं यश, हार न मानता झाला Class 1 अधिकारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल