'मी वचन देते...', कॅन्सरशी झुंजतेय मराठमोळी अभिनेत्री, तरीही संपली नाही जिद्द! राजश्री देशपांडेचं चाहत्यांना प्रॉमिस
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajshree Deshpande is battling cancer: 'सेक्रेड गेम्स' आणि 'ट्रायल बाय फायर' फेम राजश्रीने स्तनाचा कर्करोगच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून, तिच्यातील फायटर पुन्हा एकदा जगाला थक्क करतोय.
advertisement
1/7

सिनेसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने आणि सामाजिक कार्यातील झोकून देण्याच्या वृत्तीने ओळखली जाणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या एका कठीण वळणावर उभी आहे. पण हे वळण तिला थांबवण्यासाठी नाही, तर अधिक प्रबळ करण्यासाठी आलंय, हेच तिने आपल्या ताज्या पोस्टमधून सिद्ध केलंय.
advertisement
2/7
'सेक्रेड गेम्स' आणि 'ट्रायल बाय फायर' सारख्या कलाकृतींमधून घराघरांत पोहोचलेल्या राजश्रीला स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. शस्त्रक्रियेनंतर आता तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून, तिच्यातील फायटर पुन्हा एकदा जगाला थक्क करतोय.
advertisement
3/7
राजश्रीने शेअर केलेली नवी पोस्ट केवळ तिच्या प्रकृतीबद्दल नाही, तर तिच्या जिद्दीबद्दल आहे. तिने लिहिलंय, "२०२६ ची सुरुवात खूप छान झाली होती. ग्रामीण भागात दोन शाळा बांधण्याचे नियोजन, नद्यांचे पुनरुज्जीवन आणि प्रतिभावान लोकांसोबत शूटिंग... मी स्वतःला रोखू शकत नव्हते. स्वप्नांनी आणि उद्दिष्टांनी मी भरलेली होते. पण अचानक कॅन्सरचं निदान झालं. तरीही मी वचन देते, हे सगळं नक्की घडेल आणि तेही अधिक सुंदर पद्धतीने."
advertisement
4/7
राजश्रीने या आजाराकडे एक ॲडव्हेंचर म्हणून पाहण्याचं ठरवलं आहे. ती म्हणते, "हा माझ्या आयुष्याचा केवळ एक अध्याय आहे, माझी संपूर्ण कथा नाही. माझी ऊर्जा, करुणा आणि इतरांसाठी काम करण्याची जिद्द आता एका सर्व्हायव्हरच्या नात्याने अधिक वाढली आहे."
advertisement
5/7
शस्त्रक्रियेच्या वेदना आणि हॉस्पिटलचा तो रोलरकोस्टर प्रवास राजश्रीने धैर्याने पार केला. आता तिला जाणीव झाली आहे की, या समाजात स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्याची किती गरज आहे. तिने सांगितलं की, तिचं हास्य आजही तितकंच तेजस्वी आहे आणि तिचा आत्मा अधिक उजळून निघाला आहे. चाहत्यांच्या प्रार्थना आणि प्रेमामुळेच ती आज या संकटातून भरारी घेण्यास तयार झाली आहे.
advertisement
6/7
राजश्रीच्या या संघर्षात संपूर्ण मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. श्रिया पिळगांवकर, अमृता खानविलकर, छाया कदम आणि स्पृहा जोशी, इतकंच नाही तर अभय देओल यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी तिला रॉकस्टार म्हणत पाठिंबा दिला आहे.
advertisement
7/7
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानताना राजश्री म्हणाली की, लवकरच ती घरी परतेल आणि पुन्हा एकदा आपल्या सामाजिक आणि अभिनय क्षेत्रातील कामाला सुरुवात करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी वचन देते...', कॅन्सरशी झुंजतेय मराठमोळी अभिनेत्री, तरीही संपली नाही जिद्द! राजश्री देशपांडेचं चाहत्यांना प्रॉमिस