'सरकारने आता हात झटकू नयेत!' घोडबंदर घाटातील भीषण अपघातावर मराठी अभिनेत्री संतापली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ghodbunder Ghat Accident: अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने संताप व्यक्त केला असून प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.
advertisement
1/8

आज, ९ जानेवारी २०२६ च्या सकाळी ठाणेकरांसाठी एक अतिशय धडकी भरवणारी बातमी समोर आली. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात एकामागोमाग एक अशा तब्बल १४ गाड्यांची एकमेकांना धडक बसली.
advertisement
2/8
हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर वाहनांच्या काचांचा खच पडला होता. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने संताप व्यक्त केला असून प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.
advertisement
3/8
आज सकाळी नेहमीप्रमाणे घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहनांची ये-जा सुरू होती. त्याचवेळी काही हलकी वाहनं या मार्गावरून येत असताना गाड्यांवरील नियंत्रण सुटलं आणि एकापाठोपाठ एक १४ वाहनं एकमेकांवर आदळली.
advertisement
4/8
सुरुवातीला 'विरुद्ध दिशेने वाहनं चालवणं' हे कारण सांगितलं जात असलं, तरी अभिनेत्री ऋतुजा बागवेने मात्र या अपघाताचं सत्य काही वेगळंच असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
5/8
सोशल मीडियावर अपघाताचा थरारक व्हिडिओ शेअर करत ऋतुजाने राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकेची तोफ डागली. ती म्हणाली, "गाड्या विरुद्ध दिशेने आल्यामुळे हा अपघात झाला, असं म्हणून सरकारने कृपया आपले हात झटकू नयेत. या अपघाताची खरी कारणं म्हणजे 'रस्त्याची प्रचंड दुरवस्था', 'तासनतास होणारी ट्रॅफिक कोंडी', 'रस्त्यावर नसलेले ट्रॅफिक पोलीस' आणि 'प्रशासनाचं या मार्गाकडे असलेलं पूर्णपणे दुर्लक्ष' हे आहे."
advertisement
6/8
घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे आणि कायमच्या ट्रॅफिकमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच वैतागले आहेत, त्यातच अशा भीषण अपघातांमुळे लोकांच्या जिवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
7/8
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक शाखा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात अनेक लोक किरकोळ जखमी झाले असून ४ गंभीर जखमींना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
8/8
रस्त्यावर गाड्यांचे सुटे भाग विखुरलेले असल्यामुळे गायमुख ते वसई खाडी पुलापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी सध्या नागरिकांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सरकारने आता हात झटकू नयेत!' घोडबंदर घाटातील भीषण अपघातावर मराठी अभिनेत्री संतापली